*लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन वरती डंबेल्स (सिमेंन्ट विट) बसवण्याचे काम चालू*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन वरती डंबेल्स (सिमेंन्ट विट) बसवण्याचे काम चालू*
*लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन वरती डंबेल्स (सिमेंन्ट विट) बसवण्याचे काम चालू*
पाचल(प्रतिनिधी):-कोकण रेल्वे म्हटली की पहिल्यादांच मधू दंडवते यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडी येतेच त्यांची ती संकल्पना नसती तर आज कोकण रेल्वे कोकणात धावली नसती. 1990 साली सर्व साधारण कोकण रेल्वे रत्याची कामे चालू झाली. त्या वेळेस अनेक स्टेशन साधी मातीच्या स्वरूपात बांधली गेली होती. पण राजापूर आणि लांजा या दोन तालुक्याचा विचार केला गेला तर आज लांजा तालुक्यातील मध्यवर्ती सर्वांच्या सोईचे असलेले हे विलवडे रेल्वे स्टेशन मात्र चांगल्या प्रकारे बांधण्यात आले आहे. परंतु आजून सुद्धा रत्नागिरी सोडल्यास फुढे अनेक रेल्वे स्टेशने अति धोक्याची दिसून येत आहेत. लोकांना उतरण्यासाठी जिवाचे रान करून कसरत करावी लागत आहेत. रेल्वे बरोबर पटरी नसने उंचावरून खाली शिडया उतरत यावे लागते किंवा उंचावरून उडी मारणे सामाण खाली फेकून देणे (टाकणे) अशा कसरती करणे हे अजून कित्तेक स्टेशन वरती करावे लागते. हा एक प्रकारचा जनतेला धोका आहे.उदा. सौदळ, वेरवली, निवसर, आरवली आडवली,अशी अनेक स्टेशने, आहेत. परंतु विलवडे मात्र त्या यादी मध्ये येत नाही . कारण सर्व सामान्य जनतेला किंवा उतार वयांच्या लोकांना आजारी माणसांना परवडेल असे विलवडे रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे मध्ये सहज चढता यावे असे ते आहे .
त्या रेल्वे स्टेशनचे आज पटरी वरती डंबेल्स (सिमेंन्ट विट) लावून शुशोभिकरण करण्यात येत आहे. तेंव्हा परत एकदा अजून लोक वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.



