*राकेश टिकैत यांचे नवापूर (विसरवाडी) येथे जाहीर स्वागत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राकेश टिकैत यांचे नवापूर (विसरवाडी) येथे जाहीर स्वागत*
*राकेश टिकैत यांचे नवापूर (विसरवाडी) येथे जाहीर स्वागत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अमेरिका – भारत ट्रेड डील विरोधात जनजागरण मोहिमेअंतर्गत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आदरणीय राकेशजी टिकैत (शेतकरी विरोधी 3 काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी ऐतिहासिक लढ्याचे प्रमुख नेतृत्व करणारे) तसेच राष्ट्रीय महासचिव युद्धवीर सिंह महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा पहिला टप्पा खानदेश विभागात आयोजित करण्यात आला असून, सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्य सचिव आदरणीय कॉम्रेड किशोर ढमाले यांच्या नेतृत्वाखाली नवापूर (विसरवाडी) व साक्री येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जल, जंगल, जमीन, पर्यावरण, शेतकरी, शेतमजूर आणि देशाच्या अन्नसुरक्षेवर परिणाम करणाऱ्या अमेरिका –भारत ट्रेड डीलविरोधात जनजागृती करण्यासाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे.
खानदेशातील शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन
आपण सर्वांनी पक्ष, जात, धर्म आणि मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हक्कांच्या लढ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. शेतकऱ्यांची एकजूट हेच आपले सर्वात मोठे बळ आहे. चला, एकत्र येऊया आणि आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवाज बुलंद करूया.
राकेश टिकैत यांचे नवापूर(विसरवाडी) येथे उत्स्फूर्त स्वागत करू
आपले स्वागतकर्ते
कॉ. किशोर ढमाले – राज्य सचिव, सत्यशोधक शेतकरी सभा
कॉ. करणसिंग कोकणी – राज्य अध्यक्ष कॉ. आर. टी. गावीत – जिल्हाध्यक्ष, सत्यशोधक शेतकरी सभा
कॉ. रणजित गावीत – सह सचिव कॉ. दिलीप गावीत – जिल्हा सचिव कॉ. शीतल गावीत – महिला आघाडी जिल्हा सचिव शेतकरी एकजूट जिंदाबाद!
जल, जंगल, जमीन आणि पर्यावरण वाचवा!
अमेरिका–भारत ट्रेड डीलचा निषेध



