*पांगरीतील दिपक म्हादे या दृष्टीबाधित तरुणाला नॅब चिपळूणतर्फे स्वयंरोजगारासाठी कांस्य थाळी मसाजर भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पांगरीतील दिपक म्हादे या दृष्टीबाधित तरुणाला नॅब चिपळूणतर्फे स्वयंरोजगारासाठी कांस्य थाळी मसाजर भेट*
*पांगरीतील दिपक म्हादे या दृष्टीबाधित तरुणाला नॅब चिपळूणतर्फे स्वयंरोजगारासाठी कांस्य थाळी मसाजर भेट*
चिपळूण(प्रतिनिधी):-नॅब चिपळूण शाखा रत्नागिरी यांच्या वतीने दीपक रघुनाथ म्हादे राहणार पांगरी तालुका संगमेश्वर हे शंभर टक्के दृष्टि बाधित असुन यांचे स्वयंरोजगार अंतर्गत पुनर्वसन नुकतेच करण्यात आले मागील काही वर्षापासून दीपक या अंध युवकास नॅबच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले होते त्यामध्ये त्याने मसाज हे प्रशिक्षण विशेष प्राविण्य मिळवून पूर्ण केले होते हेच हेरून त्याला त्याच्या परिसरातील ग्रामीण भागात कास्य थाळी मसाजची सेवा देण्यासाठी नॅब चिपळूण तर्फे त्याला कास्य थाळी मसाजर व्यावसायिक दृष्टिकोनातून देण्यात आले दीपक म्हादे आणि कुटुंबीयांना नॅब च्या वतीने नॅबचे अध्यक्ष निलेश भुरण व कार्यवाहक भरत नांदगावकर यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नॅबचे विकास अधिकारी संदीप नलावडे व त्यांचे सहकारी श्री रुपेश गुरव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नॅब चिपळूण व म्हादे परिवाराने विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ ही बहुसंख्येने उपस्थित होते.