*देवरे विद्यालयात स्वच्छता पंधरवडा निमित्ताने विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात स्वच्छता पंधरवडा निमित्ताने विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन*
*देवरे विद्यालयात स्वच्छता पंधरवडा निमित्ताने विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात भारत पेट्रोलियम वाईंड पावर प्लांट व इंटीग्राम प्लस नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवडा निमित्ताने विद्यालयात चित्रकला, निबंध व वकृत्व स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रोजेक्ट लीडर सुमित कुमार सिदार, एच. एस.इ. इंजि. मनोज कुमार यादव, इले.इंजि. संतोष कुमार सिव्हिल इंजि. सतीश कुमार मेकॅ. इंजि.बादल सेफ्टी एडिटर हिरालाल रेल्वे सेफ्टी सुपरवायझर कमलेश चौधरी, क्लार्क गणेश पाटील व विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी पर्यावरण संवर्धन व स्वच्छता पंधरवडा यांचा सहसंबंध स्पष्ट केला.सर्वच विद्यार्थ्यांनी प्रधानमंत्री उत्साहाने सहभाग नोंदवला. चित्रकला परीक्षेत लहान गटात प्रथम भावेश पाटील, द्वितीय दिक्षा पाटील,तृतीय सोहम पाटील उत्तेजनार्थ चैताली पाटील मोठ्या गटात प्रथम कुणाल पाटील, द्वितीय गायत्री पाटील, तृतीय गुंजन पाटील उत्तेजनार्थ सोनाक्षी बिरारे तर निबंध स्पर्धेत लहान गटातून प्रथम हर्षदा भील, द्वितीय चंद्रकांत पाटील, तृतीय मुकेश मराठे उत्तेजनार्थ प्रथमेश मराठे मोठ्या गटातून प्रथम कार्तिका साळुंके, द्वितीय वैष्णवी लोहार, तृतीय गुंजन पाटील तर उत्तेजनार्थ तनुषा पाटील तसेच वकृत्व स्पर्धेमध्ये लहान गटातून प्रथम सोहम ठाकूर द्वितीय आरोही गवळे, तृतीय प्रथमेश पाटील उत्तेजनार्थ तुषार पाटील व मोठ्या गटातून प्रथम कार्तिका साळुंके, द्वितीय भावेश पाटील, तृतीय दीपेश लोहार, उत्तेजनार्थ ललिता पाटील यांनी पारितोषिके पटकावले. बीपीसीएल कंपनीकडून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य पारितोषिक म्हणून देण्यात आले. मनोज कुमार यादव यांनी सामूहिक स्वच्छता शपथ घेतली. व आपल्या मनोगततून यशस्वितांचे कौतुक करत विद्यालयातील विविध उपक्रमांचे व उत्कृष्ट स्पर्धा राबविल्याबद्दल आभार मानले. सदर स्पर्धांचे परिक्षण चित्रकला एस. एच. गायकवाड, व्ही. बी.अहिरे, ए.एस. बेडसे, निबंध स्पर्धा डॉ.आर. आर. बागुल, एम. एस.मराठे, वकृत्व स्पर्धेचे हिरालाल हेलवे, सी.व्ही. नांद्रे, एम.डी. नेरकर यांनी परीक्षण केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी.बी. पाटील, एस.जी.पाटील, एच.एम. खैरनार व एचपीसीएलचे कर्मचारी यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी.भारती तर आभार वाय.डी. बागुल यांनी मानले. बीपीसीएल तर्फे सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार व पेय वितरण करण्यात आले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



