*शेतकरी सहकारी संघाचा उपाध्यक्षपदी उद्धव पाटील यांची बिनविरोध निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शेतकरी सहकारी संघाचा उपाध्यक्षपदी उद्धव पाटील यांची बिनविरोध निवड*
*शेतकरी सहकारी संघाचा उपाध्यक्षपदी उद्धव पाटील यांची बिनविरोध निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शेतकरी सहकारी संघाचा उपाध्यक्षपदी उद्धव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया झाल्यानंतर शिवसेना नेते, आ.चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा प्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
येथील शेतकरी सहकारी संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बुधवारी संघाचा लोकनेते बटेसिंग रघुवंशी भवनात सभा घेण्यात आली. निवड प्रक्रियेत उद्धव पाटील यांच्या एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने सहाय्यक निबंधक राठोड यांनी उद्धव पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवडीनंतर शिवसेना नेते, आ.चंद्रकांत रघुवंशी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी नवनियुक्त उपाध्यक्ष उद्धव पाटील यांच्या सत्कार केला.
याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन ठाणसिंग राजपूत, बाजार समिती संचालक किशोर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे, शेतकरी संघ सदस्य गोकुळ नागरे, अरुण हजारी, प्रभाकर पाटील, लोटन पाटील, भरत राजपूत, पंडित पाटील, संतोष पाटील, विलास पाटील आदी उपस्थित होते.



