*एकलव्य विद्यालयात संस्कृत मंडळातर्फे महाकवी कालिदास जयंती निमित्त आषाढस्य प्रथम दिवस, कार्यक्रम उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात संस्कृत मंडळातर्फे महाकवी कालिदास जयंती निमित्त आषाढस्य प्रथम दिवस, कार्यक्रम उत्साहात साजरा*
*एकलव्य विद्यालयात संस्कृत मंडळातर्फे महाकवी कालिदास जयंती निमित्त आषाढस्य प्रथम दिवस, कार्यक्रम उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालयातील संस्कृत मंडळाच्या वतीने महाकवी कालिदास यांच्या जयंती निमित्त आषाढस्य प्रथमb दिवसे हा कार्यक्रम उत्साहात साजरा
आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा ज्येष्ठ संस्कृत साहित्यिक महाकवी कालिदास यांच्या जयंतीने देशभर साजरा केला जातो. या निमित्तानेच एकलव्य विद्यालय येथे संस्कृत मंडळाच्या वतीने आषाढस्य प्रथम दिवसे या शीर्षकाखाली कार्यक्रम घेत महाकवी कालिदास यांना अनोख्या पध्दतीने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कालिदास यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. कु.रेवा पवार हिने प्रास्ताविक केले. विशेष ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ध्वनिल पाटील, तनुष्का बच्छाव, देवयानी सोनवणे, पूर्वी वेंडाईत, अथर्व दाभाडे, प्रिया गावीत या विद्यार्थ्यांनी महाकवी कालिदास यांच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सहा साहित्य कृतींचा विस्तृत परिचय दिला वंश जाधव याने कालिदास यांची तर नक्ष कुवर याने राजा यक्ष याची भूमिका. मुख्य मंचावर साकारलेली होती. संस्कृत विभाग प्रमुख गौरीशंकर धुमाळ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना कालिदासांच्या साहित्याचे महत्त्व विषद करून सांगितले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे समन्वयक रोहन नटावदकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे अध्यक्षस्थानी होते तर उपमुख्याध्यापक डॉ.गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, सुनिल पाटील, रश्मीकांत त्रिवेदी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. इयत्ता नववी ई तुकडीतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कु.समृद्धी वाघ व वंश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सुमीत गिरासे याने उपस्थितांचे आभार मानले.



