*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटी सेंटर (FC) सुरू *
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटी सेंटर (FC) सुरू *
*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटी सेंटर (FC) सुरू*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटी सेंटर (FC) सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना बी.फार्मसी, डी. फार्मसी तसेच थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी (Verification) व अर्जाची पुष्टी (Confirmation) ही संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार असून प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी व सुलभ होणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बामदोड व परिसरातील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, तसेच प्रवेश प्रक्रिये संदर्भात कोणतीही अडचण असल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अधिक सुलभ, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी सांगितले.



