*सबलीकरण युवा पिढीचे, ध्येय आत्मनिर्भर भारताचे... जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये विविध उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सबलीकरण युवा पिढीचे, ध्येय आत्मनिर्भर भारताचे... जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये विविध उपक्रम*
*सबलीकरण युवा पिढीचे, ध्येय आत्मनिर्भर भारताचे...
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये विविध उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे "सबलीकरण युवा पिढीचे, ध्येय आत्मनिर्भर भारताचे" या संकल्पनेवर आधारित विविध कौशल्यविकास उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध उपक्रमांमधून आपली कौशल्ये सादर केली.
संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून देत बदलत्या काळानुसार स्वतःला सक्षम करण्याचे आवाहन करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नवोपक्रमाची वृत्ती आणि स्वावलंबनाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. योगिता पाटील तसेच मा. सचिव गणेश पाटील यांनी प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



