*अक्कलकुवा-मोलगी राज्य महामार्गावरील अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्राची संयुक्त पाहणी; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा-मोलगी राज्य महामार्गावरील अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्राची संयुक्त पाहणी; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश*
*अक्कलकुवा-मोलगी राज्य महामार्गावरील अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्राची संयुक्त पाहणी; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील अक्कलकुवा- मोलगी राज्य महामार्गावरील गंगापूर नर्सरीजवळील अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्राची संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) चे उपअभियंता सोमनाथ पवार, ज्युनिअर इंजिनिअर बिरारी व त्यांचे पथक तसेच पोलीस निरीक्षक अर्जुन पटले व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान संबंधित ठिकाणच्या रस्त्याची सद्यस्थिती, वारंवार होणाऱ्या अपघातांची कारणे, रस्त्यावरील वळणे, दृश्यमानता, रस्त्याची दुरुस्ती, वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, इशारा फलक, रिफ्लेक्टर, रोड मार्किंग, स्पीड ब्रेकर तसेच इतर सुरक्षा सुविधांचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित ठिकाणी आवश्यक त्या रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या तसेच अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतूक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत समन्वयाने आवश्यक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



