ताजा खबरे:
*शहादा येथे विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीवरील तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न*
*शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन*
*‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्
*विनापरवाना अन्न विक्री करणाऱ्या पेढ्यांवर कारवाई; व्यवसाय बंदचे आदेश!*
*13 जुलै रोजी 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, 281 हून अधिक पदांसाठी होणार भरती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्

  • Share:

*‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी दि. 01 ते 31 जुलै 2026 या कालावधीत ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाची दिलेली प्रेरणा जपत, आयुष्यभर कला आणि साहित्य क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना आर्थिक आधार व सन्मान मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांच्या योगदानाचा गौरव करून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यास सहाय्य करणे, हा या योजनेमागील प्रमुख हेतू आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत 10 वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग अर्जदारांसाठी किमान वय 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अर्जदाराचे कला अथवा साहित्य क्षेत्रातील किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक असून वयाने ज्येष्ठ असलेले विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. तसेच ज्यांची उपजीविका प्रामुख्याने कलेवर अवलंबून असून अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही, अशाच पात्र कलाकारांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन अथवा महामंडळाच्या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणारे अर्जदार या योजनेसाठी अपात्र राहतील. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती- पत्नीचे संयुक्त छायाचित्र (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), राज्य अथवा केंद्र शासनाचे संबंधित प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था किंवा व्यक्तींचे शिफारसपत्र (लागू असल्यास) तसेच आवश्यक इतर कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. सदर योजना ॲड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांच्या कलासाधनेचा सन्मान करून त्यांना सामाजिक व आर्थिक बळ देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सातत्याने विविध कल्याणकारी उपक्रम राबवत आहे. पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी अर्जाची अंतिम मुदत लक्षात घेऊन 31 जुलै 2026 पूर्वी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शहादा येथे विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीवरील तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न*
July, 09 2026
*शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन*
July, 09 2026
*‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्
July, 09 2026
*विनापरवाना अन्न विक्री करणाऱ्या पेढ्यांवर कारवाई; व्यवसाय बंदचे आदेश!*
July, 09 2026
*13 जुलै रोजी 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, 281 हून अधिक पदांसाठी होणार भरती*
July, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज