*जामिया औद्यगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळावा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जामिया औद्यगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळावा संपन्न*
*जामिया औद्यगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळावा संपन्न*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-जामिया आय.टी.आयच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला होता. हया मध्ये जामिया आई.टी.आयच्या विविध ट्रेडचे एकूण 388 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या, यात अंतिम वर्ष पूर्ण करणारे 254 विद्यार्थ्यांनी रोजगार व अप्रेन्टिस शीप साठी मुलाखाती दिल्या. ह्यामध्ये यांत्रिक मोटार गाडी, इलेक्ट्रिशीयन, आर.एसी, फिटर, सोलार टेक्निशियन, प्लंबर व कोपा आदी ट्रेडसाठी पर्किन्स व धूत ऑटोमोटीव ट्रान्समिशन, रेल्को, गब्रीएल, ज्युपिटर, सुप्रीम इंडस्ट्रीज, इत्यादी कंपनी मार्फत इंटरव्ह्यू घेऊन त्यांना सतरा ते वीस हजार (17000 ते 20000) पर्यंत देयचे ऑफर लेटर देण्यात आले.
प्रथम वर्ष पूर्ण करणारे विविध ट्रेड मधून 134 विद्यार्थ्यांनी ओ जे. टी साठी मुलाखती दिल्या.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना जामियाचे संस्था अध्यक्ष मौलाना हूझैफा वस्तानवी, संस्थेचे उपाध्यक्ष मौलाना अवेस वस्तानवी ह्यांनी शुभेच्छा दिल्या.
ह्या वेळी प्राचार्य अकबर पटेल व उपप्राचार्य इल्यास पटेल उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



