*श्रीमंत राजे दौलतसिंह रावल बी.एड. कॉलेजमध्ये वन महोत्सव साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमंत राजे दौलतसिंह रावल बी.एड. कॉलेजमध्ये वन महोत्सव साजरा*
*श्रीमंत राजे दौलतसिंह रावल बी.एड. कॉलेजमध्ये वन महोत्सव साजरा*
दोंडाईचा(प्रतिनीधी):–येथील श्रीमंत राजे दौलतसिंह रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 1 जुलै ते 7 जुलै 2026 या कालावधीत वनमहोत्सव आयोजित करण्याचे महाराष्ट्र शासन व विद्यापीठाकडून प्राप्त निर्देशानुसार विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपाणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबिबिण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस.उभाळे, प्रा. पी.डी.बोरसे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एम. ठाकरे, प्रा. ए.व्ही.चव्हाण यांध्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या प्रांगणात झाडे करून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. एम. एस.उभाळे यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगितले." झाडे लावल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राहते. योग्य प्रमाणात प्राणवायू झाडापासून तयार होत असतो. तसेच प्राण्यांसाठी अन्न, सावली आणि स्वच्छ पर्यावरण झाडांमधून मिळते. अनेक पिढ्यांसाठी झाडे उपयोगी ठरतात. तसेच प्रा.पी.डी.बोरसे यांनी ‘एक पेड मां के नाम’ अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करून, प्रदुषणमुक्त वातावरणासाठी हातभार लावूया, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. एम.एस. उभाळे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पी.डी.बोरसे, प्रा. एस.एम.ठाकरे, प्रा. ए.व्ही.चव्हाण, प्रा.डॉ.वाय.आर.चौधरी, प्रा.आर. के.बागुल, प्रा. आर.पी.पाटील, प्रा. एन.जे.ठाकूर यांनी प्रयत्न केले. शिक्षेकेतर कर्मचारी कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत, जयेश धनगर व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी शिक्षक कार्यक्रमात सहभागी होते.



