*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सहकार सप्ताह निमित्त कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सहकार सप्ताह निमित्त कार्यक्रम*
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सहकार सप्ताह निमित्त कार्यक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य व ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सहकारी संस्था व पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ संचलित सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार सप्ताह निमित्त वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नीरज भगवान चौधरी, सहाय्यक निबंधक आर. आर. राठोड, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर गिरीश पवार, पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी सुहास नटावदकर व सचिव गणेश राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.ए. कृष्णा गांधी यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी सहकारी चळवळीचा इतिहास व सहकारी संस्थेची गरज यावर मनोगत व्यक्त केले. सहाय्यक निबंध आर. आर. राठोड यांनी सहकारी चळवळीचे महत्त्व आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. जिल्हा उपनिबंधक निरज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची गरज यावर मार्गदर्शन केले. पतपेढीच्या अध्यक्षा सुहासिनी नटावदकर यांनी जिल्हा उपनिबंधक नीरज चौधरी यांचा सत्कार केला व त्यांना सेवानिवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्यात. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद व सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे आभार डॉ.गिरीश पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक सौ वर्षा घासकडबी यांनी केले.



