*नंदुरबार येथे तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न*
*नंदुरबार येथे तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तृतीयपंथीय व्यक्तींचे आरोग्य संरक्षण आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने नंदुरबार येथे विशेष आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने 30 जून 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे हे शिबीर पार पडले. या शिबिरास तृतीयपंथीय समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
आरोग्य तपासणी व औषधोपचार: शिबिरामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच वजन व उंची मोजणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत औषधोपचार व वैद्यकीय सल्ला देण्यात आला, तर पुढील उपचारांसाठी गरजू लाभार्थ्यांना संबंधित रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले. यासोबतच मानसिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, पोषण आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शासकीय योजनांची माहिती: शिबिरादरम्यान तृतीयपंथीय व्यक्तींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, आरोग्य सेवा, ओळखपत्र, प्रमाणपत्र व सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली. "समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणे ही शासनाची प्राथमिकता असून, तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी विभाग सातत्याने कार्यरत राहील," असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती: या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी अमोल मोरे, गणेश बोराणे, औषध निर्माण अधिकारी डॉ. तुषार ठाकरे, ICTC समुपदेशक तेजल माळी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे आणि समाज कल्याण निरीक्षक सचिन जगताप यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व तृतीयपंथीय समाजातील सदस्य उपस्थित होते. उपस्थित लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशी शिबिरे नियमित आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.



