*जिल्हा पोलीस दलातर्फे जुन्या व जीर्ण साहित्याचा 6 जुलै रोजी जाहीर लिलाव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा पोलीस दलातर्फे जुन्या व जीर्ण साहित्याचा 6 जुलै रोजी जाहीर लिलाव*
*जिल्हा पोलीस दलातर्फे जुन्या व जीर्ण साहित्याचा 6 जुलै रोजी जाहीर लिलाव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस मुख्यालय, विविध पोलीस स्टेशन तसेच इतर उपकार्यालयांमध्ये जमा झालेले जुने आणि जीर्ण झालेले साहित्य व साधनसामग्रीचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. ही लिलाव प्रक्रिया सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालय, टोकर तलाव रोड, राजीव गांधी मार्ग, नंदुरबार येथे पार पडणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अश्विनी सानप यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या लिलावामध्ये संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशिन, लोखंडी कपाटे, पत्रे, खुर्च्या, टेबल आणि इतर विविध जुन्या साहित्याचा समावेश आहे. या जाहीर लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी समक्ष हजर राहावे, असेही आवाहन पोलीस अधीक्षक श्रीमती सानप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



