*1 जुलै 2026 रोजी माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात "कृषि दिन" कार्यक्रम साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*1 जुलै 2026 रोजी माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात "कृषि दिन" कार्यक्रम साजरा*
*1 जुलै 2026 रोजी माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात "कृषि दिन" कार्यक्रम साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-1 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृह येथे कृषि दिन दिमाखात साजरा करणेत आला. कृषि दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
चंद्रकांत पवार यांनी भुषविले. तसेच सदर कार्यक्रमास शंकर किरवे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार, प्रविण देवरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. नंदुरबार, दिपक पटेल, प्रकल्प संचालक (आत्मा) नंदुरबार, डॉ.यु.बी. होले, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय, किशोर हडपे कृषि विकास अधिकारी, राजेंद्र दहातोंडे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोळदा, श्रीमती अर्चना वाघमळे गट विकास अधिकारी पंचायत समिती नंदुरबार, दिनेश देविदास पाटील सहा. कृषी अधिकारी बीज गुणन केंद्र चोपडा, यु.टी. गिरासे जिल्हा कृषि अधिकारी (सा.), सचिन देवरे, मोहीम अधिकारी, डी. बी. लोंढे जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. सदर कृषि दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नंदुरबार यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवराचे सत्कार करून स्वागत करण्यात आले. तद्नंतर किशोर हडपे कृषि विकास अधिकारी, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. तसेच नंदुरबार जिल्ह्यात सन 2024-25 व सन 2025-26 अंतर्गत घेण्यात आलेल्या पिक स्पर्धेत राज्यस्तर/विभागस्तर/जिल्हास्तरावर निवड झालेल्या शेतकऱ्यांचा व नाविन्यपुर्ण बाबी राबविलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांना शाल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. श्रीमती. जयंतीबाई कोमु नाईक रा. बोरचक ता. नवापुर, रुपसिंग सेल्या नाईक रा. डोंगेगाव ता. नवापुर, विनोद निंबा पाटील रा. वैजाली ता. शहादा, प्रकाश दामु चौधरी रा. चौपाले ता. नंदुरबार, निर्मलसिंग नामदेव गिरासे रा. ओसर्ली ता. नंदुरबार,
बायसिंग पाडक्या पावरा रा. भुजगाव ता. अक्राणी, केला नाऱ्या वसावे रा. धांद्रे बु. ता. शहादा, ज्ञानेश्वर सुरेश पाटील रा. शनिमांडळ ता. नंदुरबार चुड्या भोग्या पावरा रा. रेवानगर ता. तळोदा, रमेश होडया मावची रा. झामणझर ता. नवापूर, श्रीमती. निशा किशोर चौधरी रा. कोरीट ता. नंदुरबार, सुर्या लाशा गावित रा. रायपुर ता. नवापूर
श्रीमती. हिराबाई कर्मा चौरे रा. ठाणेपाडा ता. नंदूरबारश्रीमती. लिलाबाई नानाभाऊ भिल
रा. काकर्दा दिगर ता. शहादा, सुन्या फुलजी वसावे रा. वेरी ता. अक्कलकुवा,
पावबा विक्रम पाटील रा. बह्याणे ता. नंदुरबार, सुभाष धनजी वसावे रा. उमराण ता. नवापूर, जितेंद्र कोठ्या कोकणी रा. मोग्राणी ता. नवापूर, विकास मधुकर पाडवी रा. शेल्टापाणी ता. अक्कलकुवा, विठोबा रामदास माळी रा. जयनगर ता. शहादा, दिलीप भगवान निझरे रा. लोंढरे ता. शहादा, मिलिंद लक्ष्मीकांत पाटील रा. बोरद ता. तळोदा, सेगा राज्या पटले रा. कुंभरी ता.अक्राणी, दिलीप नरेश पाडवी रा. सुरवाणी ता. अक्राणी, मुकेश जगतसिंग राऊळ रा. मांजरे ता. नंदुरबार, राजेंद्र दहातोंडे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोळदा, यांनी एल-निनो प्रवाहित असल्याने एल-निनो प्रभावामुळे शेतीवर होणारा परिणाम, उपाययोजना व व्यवस्थापन याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गट विकास अधिकारी, पंवायत समिती नंदुरबार श्रीमती अर्चना वाघमळे यांनी नंदुरबार तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या #Greennands Nandurbar या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. दिनेश देविदास पाटील, सहा. कृषी अधिकारी, बीज गुणन केंद्र चोपडा यांनी खरीप व रब्बी हंगामात शेतीमधील किड व्यवस्थापनाव्दारे पिक संवर्धनाविषयी घ्यावयाची काळजी बाबत उपस्थित शेतकऱ्यांना पारंपारीक उदाहरणे देवून समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नंदुरबार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना एल निनोच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजना तसेच पेरणी बाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तद्नंतर कृषि विकास अधिकारी, किशोर हडपे, यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपल्याचे घोषित केले. सदर कार्यक्रमास एम. जी. विसपूते, विस्तार अधिकारी (कृषी), वाय.एस. हिवराळे, विस्तार अधिकारी (कृषी), के. एस. गिरासे, सहा. प्रशासन अधिकारी, वाय. के. सोनवणे, कनि. प्रशासन अधिकारी, आर.एम. जाधव, कनि. लेखाधिकारी, एच. आर. भामरे, वरिष्ठ सहा. संदिप पंडीत कनि. सहा., विलास कोकणी कनि. सहा., श्रीमती ए.एस. माळी कनि. सहा., श्रीमती प्रमिला गांगुर्डे कनि. सहा., श्रीमती शुभांगी गावित कनि. सहा. (लेखा), श्रीमती. एस. एस. कोळी परिचर, मनोज पवार, परिचर यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणसिंग गिरासे, उप कृषि अधिकारी, नंदुरबार यांनी केले.



