*खरीप हंगामपूर्व शेतकरी संवाद मध्ये मृदा आरोग्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांचा संकल्प काकरदा येथे अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खरीप हंगामपूर्व शेतकरी संवाद मध्ये मृदा आरोग्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांचा संकल्प काकरदा येथे अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*खरीप हंगामपूर्व शेतकरी संवाद मध्ये मृदा आरोग्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांचा संकल्प काकरदा येथे अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
धडगाव(प्रतिनिधी):-राष्ट्रव्यापी “खेत बचाओ अभियान” अंतर्गत काकरदा येथे खरीप पूर्व हंगाम बैठकीचे आयोजन करण्यात आले. मृदा आरोग्य संवर्धन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, मृदा परीक्षणाचे महत्त्व, नैसर्गिक शेती तसेच शाश्वत कृषी पद्धतींचा प्रसार या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ शेख (डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट सपोर्ट, नंदुरबार) यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र मोरे (DDM, नाबार्ड) होते, तर दीपक पटेल (प्रकल्प संचालक, आत्मा) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख मार्गार्शन उमेश पाटील, सौ आरती देशमुख होते. दीपक पटेल यांनी खरीप हंगामात भरडधान्यांच्या (Millets) लागवडीचे महत्त्व विशद केले. बदलत्या हवामान परिस्थितीत भरडधान्ये ही कमी खर्चिक, पोषण मूल्यांनी समृद्ध आणि शाश्वत पर्याय असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर त्यांची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारचे उमेश पाटील शास्त्रज्ञा यांनी मृदा परीक्षणाचे महत्त्व, मातीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, मृदा आरोग्य पत्रिकेचा प्रभावी वापर तसेच शास्त्रीय अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे उत्पादन खर्च कमी करून पीक उत्पादकता वाढविण्याचे नैसर्गिक शेती व खरीप हंगामातील नियोजन व उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याने नियमित मृदा परीक्षण करून शिफारशीनुसार खतांचा वापर करावा, तसेच खेती बचाव अभियानबाबत उपस्थित शेतकऱ्यांना जागृत केले.
सौ. आरती देशमुख, शास्त्रज्ञ (गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी “खेत बचाओ अभियान”ची उद्दिष्टे, मृदा आरोग्याचे संवर्धन आणि शाश्वत शेतीचे महत्त्व याविषयी माहिती दिली. त्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांमधील संधींबाबत मार्गदर्शन करत शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगांकडे वळल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे सांगितले.
उप कृषी अधिकारी प्रमोद राजपूत यांनी सध्याच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध खतांची उपलब्धता, खतांचा संतुलित व कार्यक्षम वापर, तसेच नैसर्गिक शेतीच्या वाढत्या महत्त्वाविषयी माहिती दिली. रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी करून स्थानिक उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शेतकऱ्यांनी मृदा आरोग्य जपत शाश्वत शेती पद्धतींचा स्वीकार करावा, असेही त्यांनी नमूद केले.
आत्मा संस्थेचे महेंद्र बाविस्कर यांनी नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट सपोर्टचे कृष्णा चव्हाण, यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची भूमिका या वर मार्गदर्शन केले.आमू आखा एक से शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक पाटील, गुजऱ्या पाडवी, भरत पावरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमू आखा एक से शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक लालसिंग वळवी यांनी आपल्या मनोगतात “खेत बचाओ अभियान” अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले. मृदा आरोग्य, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पशुसंवर्धन आणि शाश्वत शेतीविषयक मिळालेली माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अशा प्रकारचे शेतकरी हिताचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. मृदा आरोग्य संवर्धन, रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय व जैविक पर्यायांचा अवलंब तसेच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन याबाबत शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आपल्या गावांमध्ये मृदा परीक्षण, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये “खेत बचाओ अभियान” विषयी जागरूकता निर्माण होऊन मृदा आरोग्य आणि शाश्वत शेतीबाबत सामुदायिक सहभाग अधिक बळकट झाला.



