*नगरपालिकेत अत्याधुनिक 'सक्शन कम जेटिंग' मशीन दाखल; पावसाळ्यात गटारी तुंबण्याच्या समस्येवर मात- आ.चंद्रकांत रघुवंशी पाठपुराव्यातून पालिकेला मिळाले 1 कोटीचे वाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नगरपालिकेत अत्याधुनिक 'सक्शन कम जेटिंग' मशीन दाखल; पावसाळ्यात गटारी तुंबण्याच्या समस्येवर मात- आ.चंद्रकांत रघुवंशी पाठपुराव्यातून पालिकेला मिळाले 1 कोटीचे वाहन*
*नगरपालिकेत अत्याधुनिक 'सक्शन कम जेटिंग' मशीन दाखल; पावसाळ्यात गटारी तुंबण्याच्या समस्येवर मात- आ.चंद्रकांत रघुवंशी पाठपुराव्यातून पालिकेला मिळाले 1 कोटीचे वाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी स्वच्छ भारत संचालनालयाकडून नगरपालिकेला अत्याधुनिक 'सक्शन कम जेटिंग' मशीन वाहन उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचे लोकार्पण शिवसेना नेते तथा आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
स्वच्छ भारत संचालनालयाकडे नगरपालिकेला अत्याधुनिक मशीन मिळावे यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रयत्न केले होते. आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि. निर्मित ही अत्याधुनिक मशीन गटारे, नाले आणि भूमिगत ड्रेनेज लाईनची सफाई करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या मशीनमध्ये 8 हजार लिटर क्षमतेची दुहेरी टाकी असून, एका भागात सांडपाणी व गाळ सक्शनद्वारे उचलण्याची तर दुसऱ्या भागात उच्च दाबाने पाण्याचा मारा करून ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्याची सुविधा आहे. या मशीनमुळे शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, गटार सफाई आणि ड्रेनेज देखभाल अधिक वेगाने व प्रभावीपणे करता येणार असून, नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच पावसाळ्यात गटारे तुंबण्याच्या समस्या कमी करण्यासही या वाहनाचा मोठा फायदा होणार आहे. लोकार्पण प्रसंगी आरोग्य सभापती प्रीतम धंडोरे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,मुख्याधिकारी राहुल वाघ, नगरसेवक किरण रघुवंशी, कुणाल वसावे, गौरव चौधरी, कमल ठाकूर, विजय माळी,चेतन वळवी, भूषण नेरे, आकाश अहिरे उपस्थित होते. 'सक्शन कम जेटिंग' मशीन पालिकेला मिळावे यासाठी स्वच्छ भारत संचालनालयाकडे पाठपुरावा केला होता. शहराच्या स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आहे. नागरिकांच्या आरोग्य व सुविधांना प्राधान्य देण्याची भूमिकेतून या नव्या वाहनाच्या समावेशामुळे स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळणार आहे.
असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले आहे.



