*शैलेश टिळक यांची ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या कोशाध्यक्ष पदी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शैलेश टिळक यांची ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या कोशाध्यक्ष पदी निवड*
*शैलेश टिळक यांची ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या कोशाध्यक्ष पदी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय ज्यूदो महासंघाच्या कोशाध्यक्ष पदी महाराष्ट्र चे शैलेश टिळक यांची निवड करण्यात आली आहे. ज्यू दो फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड निवडणूकीत महाराष्ट्राचे शैलेश टिळक यांची बहुमताने कोशाध्यक्ष पदी निवड झाली. या निवडणुकीत शैलेश टिळक यांना एकूण 37 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी केरळ राज्याचे श्रीकुमार यांना 23 मते मिळाली तसेच शैलेश टिळक हे सध्या महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष आहेत. व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. या निवडणुकी मुळे ज्यूदो महासंघावरील चार वर्षां पासूनचे प्रशासकीय राज संपुष्टात आले असून लोकशाही मार्गाने नवी कार्यकारणी अस्तित्वात आली महासंघाची नवी घटना तयार करणे आगामी कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धेसाठी संघ निवड प्रक्रिया पार पाडणे ही प्रमुख आव्हाने नव्या कार्यकारणी समोर असतील तसेच नव्या कार्यकारणी मध्ये ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून मध्यप्रदेश चे मुकेश कुमार तर आसाम राज्याचे महासचिव बानी बात्रा दास हे प्रमुख पदाधिकारी असून कार्यकारणी मध्ये एकूण चार उपाध्यक्ष चार सहसचिव व अकरा सभासद आहे. शैलेश टिळक यांच्या निवडी बद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महासचिव संजय शेटे, उद्योगपती पुनीत बालन यांनी शुभेच्छा दिल्या.



