*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रव्यापी “खेत बचाओ अभियान” अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील घोगलपाडा येथे शेतकऱ्यांमध्ये मृदा आरोग्य संवर्धन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, मृदा परीक्षणाचे महत्त्व आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच सौ. सुमित्रा वळवी यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून दिपक पटेल, प्रकल्प संचालक, आत्मा, नंदुरबार उपस्थित होते. त्यांनी सध्याच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध खतांची उपलब्धता, खतांचा कार्यक्षम व संतुलित वापर तसेच नैसर्गिक शेतीच्या वाढत्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन केले. रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी करून स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शेतकऱ्यांनी मृदा आरोग्य जपत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उमेश पाटील, शास्त्रज्ञ (कृषीविद्या) यांनी संतुलित खत व्यवस्थापन, सेंद्रिय पदार्थांचा वापर, हिरवळीची खते आणि पीक पद्धतीतील सुधारणा याविषयी सविस्तर माहिती दिली. सौ. आरती देशमुख, शास्त्रज्ञ (गृहविज्ञान) यांनी “खेत बचाओ अभियान” ची उद्दिष्टे, मृदा आरोग्य संवर्धनाचे महत्त्व आणि शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. खुशाल राठोड, शास्त्रज्ञ (पशुसंवर्धन) यांनी शेती व पशुपालन यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेणखताचा प्रभावी वापर आणि पशुधनाच्या माध्यमातून शाश्वत शेतीस मिळणारे योगदान तसेच चारपीक लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.
आणि प्रविण चव्हाण यांनी मृदा परीक्षणाचे महत्त्व, मातीतील अन्नद्रव्यांची स्थिती, मृदा आरोग्य पत्रिकेचा वापर तसेच शास्त्रीय अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करून पीक उत्पादकता वाढविण्याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांना नियमित मृदा परीक्षण करून शिफारशीनुसार खतांचा वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. मृदा आरोग्य जतन करणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे, सेंद्रिय व जैविक पर्यायांचा अवलंब करणे तसेच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे याबाबत शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आपल्या गावांमध्ये मृदा आरोग्य संवर्धन, मृदा परीक्षण आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये “खेत बचाओ अभियान” विषयी जागरूकता निर्माण होऊन मृदा आरोग्य व शाश्वत शेतीबाबत सामुदायिक सहभाग अधिक बळकट झाला.
कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, बचत गटांच्या प्रतिनिधींसह विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी गावाचे उपसरपंच शैलेश पाडवी यांनी आपल्या मनोगतात “खेत बचाओ अभियान” अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले. मृदा आरोग्य, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पशुसंवर्धन आणि शाश्वत शेतीविषयक मिळालेली माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारचे शेतकरी हिताचे कार्यक्रम नियमितपणे गावामध्ये आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून उपस्थित मान्यवर, शास्त्रज्ञ आणि आयोजकांचे आभार मानले.



