*क्रीडा विषयक विविध योजनांसाठी अनुदान,शाळा आणि संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*क्रीडा विषयक विविध योजनांसाठी अनुदान,शाळा आणि संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
*क्रीडा विषयक विविध योजनांसाठी अनुदान,शाळा आणि संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे विविध क्रीडा विषयक अनुदान योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास तसेच युवक कल्याण योजनांसाठी पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक शाळा आणि संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव 20 जून 2026 पर्यंत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. सुधारित शासन निर्णयानुसार नवीन व्यायामशाळा बांधकामासाठी तसेच साहित्य खरेदीसाठी कमाल 14 लक्ष रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल. बंदिस्त व खुल्या व्यायामशाळेसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी कमाल 7 लक्ष रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा, आश्रमशाळा, अनुदानित शाळा / कनिष्ठ महाविद्यालये व शासकीय कार्यालये या योजनेसाठी पात्र आहेत. शालेय व स्थानिक पातळीवर क्रीडांगणांचा दर्जा सुधारण्यासाठी हे अनुदान दिले जाते. क्रीडांगण समपातळीत करणे, धावनपथ (रनिंग ट्रॅक) तयार करणे, कुंपण घालणे, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, फ्लड लाईट्स, प्रेक्षक गॅलरी, ड्रेनेज व स्प्रिंकलर यंत्रणा अशा विविध कामांसाठी कमाल 7 लक्ष रुपये अनुदान दिले जाईल. क्रीडा साहित्याच्या खरेदीसाठी स्वतंत्रपणे कमाल 3 लक्ष रुपये अनुदान मंजूर केले जाईल. 100 टक्के खाजगी अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, केंद्र शासनाच्या शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्रस्ताव सादर करू शकतात. ग्रामीण व नागरी भागातील तरुण मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. नोंदणीकृत युवक मंडळांना स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर व सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यासाठी कमाल 25 हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य दिले जाईल. केवळ नोंदणीकृत युवक मंडळे आवश्यक कागदपत्रांसह यासाठी पात्र राहतील.
योजनानिहाय विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावेत. परिपूर्ण भरलेले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतीत 20 जून 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करणे अनिवार्य आहे. प्राप्त झालेल्या प्रस्तावांना प्राधान्यक्रमाने मंजुरी देण्यात येईल. असेही जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



