*सुरगाणा पंचायत समितीत शिव स्वराज्य दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुरगाणा पंचायत समितीत शिव स्वराज्य दिन उत्साहात साजरा*
*सुरगाणा पंचायत समितीत शिव स्वराज्य दिन उत्साहात साजरा*
सुरगाणा(प्रतिनिधी):-पंचायत समिती सुरगाणा येथे शिव स्वराज्य दिनानिमित्त राजदंड गुढी उभारून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या प्रांगणात शासन निर्णयानुसार भगवा स्वराज्य ध्वज संहितेनुसार भगवी जरी पताका, ध्वज लांबी, रुंदी, जिरे टोप, सुवर्ण होन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे या पंच शुभ चिन्हांनी अलंकृत करण्यात आला होता. राजदंडावर सुवर्ण व लाल कापडाची गुंडाळून राजदंड उभारण्यात आला होता. गुढीवर सुवर्ण कलश चढवून पुष्पाहार अर्पण करुन त्यावर आंब्याची डहाळी बांधून अष्टगंध, अक्षता, हळद वाहण्यात आले. शिवशक राज दंड स्वराज्य गुढी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलिप रणवीर, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व. हि. व्ही. निकम, पशुसंवर्धन उपायुक्त सुभाष हिंगे यांच्या हस्ते राजदंड उभारण्यात आला. सामुहिक राष्ट्रगीत, राज्य गीत गायनाने राजदंडाला मानवंदना देण्यात आली. यावेळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रतन चौधरी यांनी शिश स्वराज्यभिषेक दिनाची महती विशद केली. यामध्ये राज्य भिषेकाची वैशिष्ट्ये, राजमुद्रा, अष्टप्रधान मंडळ, पार्श्वभूमी, भाषा प्रशासन, दान धर्म उपस्थिती या विषयी माहिती सांगितली. शिव स्वराज्य दिन जलोषात साजरा करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभाग प्रमुख वाघेरे, किशोर अहिरे,
लेखनिक पुंडलिक दळवी, युवराज राऊत, सुनील गवळी, मुख्याध्यापक सुरेश जाधव, रतन चौधरी, सहादू चौधरी, पालवी आदी उपस्थित होते.



