*'होम-बेस केअरगिव्हर' पदांसाठी 3 हजार 500 जागांची मेगा भरती-मंगेश वाघ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'होम-बेस केअरगिव्हर' पदांसाठी 3 हजार 500 जागांची मेगा भरती-मंगेश वाघ*
*'होम-बेस केअरगिव्हर' पदांसाठी 3 हजार 500 जागांची मेगा भरती-मंगेश वाघ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) यांच्या वतीने इस्त्रायलमध्ये 'होम-बेस केअरगिव्हर' पदांसाठी तब्बल 3 हजार 500 जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.पात्रतेचे प्रमुख निकष:
लिंग, एकूण जागांपैकी 90 टक्के जागा महिलांसाठी आणि 10 टक्के जागा पुरुषांसाठी राखीव आहेत.
वय: 25 ते 45 वर्षे
शिक्षण:किमान 10 वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता, उंची किमान 1.5 मीटर आणि वजन किमान 45 किलो .
पासपोर्ट, किमान 3 वर्षांची वैधता असलेला पासपोर्ट असणे अनिवार्य आहे. भाषा, इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान आवश्यक आहे. आवश्यक अनुभव आणि प्रमाणपत्र,
मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 990 तासांचा केअरगिव्हिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा
किंवा नर्सिंगमधील GDA, ANM, GNM अथवा B.Sc Nursing ची पदविका/पदवी धारक असावेत.
महत्त्वाच्या अटी, उमेदवार यापूर्वी कधीही कामासाठी इस्त्रायलला गेलेला नसावा. उमेदवाराचे जवळचे नातेवाईक (पती/पत्नी, आई- वडील, मुले) सध्या इस्त्रायलमध्ये कार्यरत नसावेत
अर्ज प्रक्रिया,
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी आणि ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी https://nsdcjobx.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 2 लाख पर्यंत मानधन मिळणार असल्याचेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



