*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रातील 22 जिल्हे आणि 100 हून अधिक विधानसभा मतदारसंघांना भेट देतील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रातील 22 जिल्हे आणि 100 हून अधिक विधानसभा मतदारसंघांना भेट देतील*
*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रातील 22 जिल्हे आणि 100 हून अधिक विधानसभा मतदारसंघांना भेट देतील*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शिवसेना पक्षाचे मुख्यनेते व राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार दि. 30 मार्च 2026 रोजी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी लोकसभानिहाय संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये खासदार युवा नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सुद्धा संपूर्ण मुंबई व ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नियुक्ती झाल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मुंबई शहरातील लोकसभानिहाय तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघाचा संवाद दौरा यशस्वीरीत्या संपन्न झाला. त्यासोबतच खासदार यांनी संघटन बांधणीसाठी उर्वरित महाराष्ट्राचा दौराही केला. यात प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होता. आपल्या सर्वाच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील 65 ते 70 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांशी थेट संवाद साधला होता. कुठेही सभा किंवा भाषण न करता पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने मौल्यवान सूचना व मार्गदर्शन केले. त्यांच्या या दौ-यांमुळे पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश प्राप्त झाले. आता देखील त्याच पध्दतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय शिवसेना कार्यकर्ता संवाद दौरा सुरू होत आहे. हा संवाद दौरा दि. 16 मे 2026 पासून सुरू होऊन 15 जुलै 2026 पर्यंत दोन महीने चालेल. या दौऱ्या दरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रातील 22 जिल्हे आणि 100 हून अधिक विधानसभा मतदारसंघांना भेट देतील व तेथील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी व लोकप्रतिनिधि यांचाशी थेट संवाद साधतील या दौऱ्यादरम्यान आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तयारीचा आढावा घेतला जाईल तसेच शिवसेना, महिला आघाडी, युवसेना जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे नेमणुका झाल्यापासून ते आता पर्यंतचा कार्य अहवाल मागवून त्यांचा कार्याचा आढावा घेतला जाईल. बूथ स्तरावर पक्षबांधणी व रणनीतीचाही आढावा घेतला जाईल. तसेच SIR मोहीमेअंतर्गत शिवसेना BLA 1/ BLA 2. बूथ प्रमुख यांचा नेमणुकांचा आढावा घेतला जाईल. या दौऱ्याच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्थानिक कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन. उपस्थित कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या व सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त ताकद देण्याचे प्रयत्न करणार आहेत. तसेच संघटना बांधणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा दौरा असणार आहे.



