*राजापूरमध्ये सर्व सेवा एकाच छताखाली मिळण्यासाठी नगरसेवक महेश शिवलकर यांचा'सुविधा केंद्र'चाप्रस्ताव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूरमध्ये सर्व सेवा एकाच छताखाली मिळण्यासाठी नगरसेवक महेश शिवलकर यांचा'सुविधा केंद्र'चाप्रस्ताव*
*राजापूरमध्ये सर्व सेवा एकाच छताखाली मिळण्यासाठी नगरसेवक महेश शिवलकर यांचा'सुविधा केंद्र'चाप्रस्ताव*
राजापूर(प्रतिनिधी):-शहरातील नागरिकांची दैनंदिन कामांसाठी होणारी धावपळ किंबहुना ससेहोलपट थांबवण्यासाठी नगरसेवक महेश शिवलकर यांनी पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मोबाईल दुरुस्तीपासून ते बँकिंग व कुरिअर सेवांपर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी 'एकीकृत नागरी सेवा सुविधा केंद्र' उभारण्याची मागणी त्यांनी नगराध्यक्षांकडे केली आहे. बुधवारी दिलेल्या निवेदनात शिवलकर यांनी म्हटले की, सध्या नागरिकांना वेगवेगळ्या कारागिरांसाठी अनेक ठिकाणी जावे लागते. राजापूरात नागरिकांना वेळेत ते कधीच उपलब्ध होत नाहीत. अनेकदा काहींची योग्य दर व गुणवत्तेची शाश्वती नसल्याने फसवणूक होते. नगर परिषदेने मध्यवर्ती कॉम्प्लेक्स उभारून नोंदणीकृत कारागीर व सेवा पुरवठादारांना खास गाळे उपलब्ध करून दिल्यास हा प्रश्न सुटेल. प्रस्तावित केंद्रात या सेवा असतील - घरगुती दुरुस्ती इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार, रंगकाम, साफसफाई, चिऱ्यांची कामे, इलेक्ट्रॉनिक्स - लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही, एसी दुरुस्ती दैनंदिन सुविधा - कुलूप दुरुस्ती, पंखे दुरुस्ती, स्वच्छता - पेस्ट कंट्रोल, टाकी सफाई, इतर - झेरॉक्स, आधार अपडेट, कुरिअर
६ आपत्कालीन - 24x7 हेल्पलाईनसह तातडीची सेवा
काय साध्य होईल?
शिवलकर यांच्या मते, यामुळे नागरिकांना खात्रीशीर सेवा मिळतील, स्थानिक तसेच अन्य भागातील गरजू कारागिरांना रोजगार मिळेल आणि नगर परिषदेला गाळ्यांच्या भाड्यातून कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा अधिक सुरक्षित ठरेल.
या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देऊन जागा व अर्थसंकल्प निश्चित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता नगर परिषदेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.



