*घुणकीत वंचितचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या 72 व्या वाढदिवसाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घुणकीत वंचितचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या 72 व्या वाढदिवसाचे आयोजन*
*घुणकीत वंचितचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या 72 व्या वाढदिवसाचे आयोजन*
घुणकी(प्रतिनिधी):-येथील सिद्धार्थ नगरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक नेते ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या 72 व्या वाढदिवस संपूर्ण राज्यभर स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून उत्सव समितीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर आयोजित केले असल्याचे प्रतिपादन उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 10.10 मिनिटांनी रक्तदान शिबिरचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, सचिव अरुण जमने उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी वडगाव नगरपालिकेचे नगरसेवक मिलिंद सनदी हेही उपस्थित राहणार आहे. तसेच आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन पंचायत समिती सदस्य सौ कल्याणी राजवर्धन मोहिते व कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच सौ सुजाता जाधव उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमास संजीवन ब्लड बँक कोल्हापूर व जानकी हॉस्पिटल कोल्हापूर यांचे सौजन्याने होणार आहे. प्रथम सत्र सकाळी 10.10 ते 1.10 पर्यंत सिद्धार्थ नगर ( गावभाग ) व द्वितीय सत्र 2.10 ते 5.10 पर्यंत डॉ आंबेडकर नगर (गायरान वसाहत) होणार आहे.
या कार्यक्रमास आयोजक उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार सचिन कांबळे, वाचनालय सचिव सौ अर्चना कांबळे, गौतम कांबळे, महेंद्र कांबळे, सुशांत पाटोळे, ओंकार कांबळे, संदीप पाटोळे, अविनाश पाटोळे, जितेंद्र कांबळे, सुभाष कांबळे, अजित पाटोळे, यावेळी सर्वच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे उत्सव समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.



