ताजा खबरे:
*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*

  • Share:

*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*
रत्नागिरी(प्रतिनिध):-अनुसूचित जमातींचे 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध प्रकरणी कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा रत्नागिरी कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार दापोली यांना देण्यात आले.  राज्यात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या स्थापनेपासून नोव्हेंबर 2023 पर्यंत प्रमाणपत्र तपासणीसाठी तब्बल 7 लाख 11 हजार 652 दावे जात दाखल झाले. यापैकी 6 लाख 26 हजार 200 जात प्रमाणपत्रे वैध ठरली, तर 37 हजार 599 अवैध ठरली आहेत. समित्यांनी इतर कारणाने निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या 30 हजार 750 आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत जातपडताळणी समित्यांनी एकूण निकाली काढलेली प्रकरणे 6 लक्ष 94 हजार 550 आहेत, तर प्रलंबित जात प्रमाणपत्र दाव्यांची संख्या 17 हजार 102 आहे. समाज कल्याण विभागातून सन 1983 मध्ये आदिवासी विकास विभाग वेगळा झाल्यानंतर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी तपासणी समिती स्थापन करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे या प्रकरणात ठाकूर, कोळी महादेव, हलबा, गोंड, माना, मन्नेरवारलू, टोकरे कोळी, ठाकर या जमातींत सर्वाधिक घुसखोरी आहे तर ओरॉन, कोया, डोंगर कोळी, कोळी डोर, टाकणकार, पारधी, छत्री, कवर, कमार, ओझा, नायकपोड, अराख, बिझवार, भुजीया, पावरा, तडवीभील या जमातींचेही जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले आहे. परंतु, त्यांचे प्रमाण नगण्य आहे. या जमातीत कमी घुसखोरी आहे.केलेल्या सूचना विचारात घेऊन राज्य शासनाने जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे अधिनियम 2000 व नियम 2003 तयार केले आहेत. जमातींचे प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी आतापर्यंत राज्यात पुणे, ठाणे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, गडचिरोली, पालघर, किनवट, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, धुळे व नाशिक-2 अशा 15 तपासणी समित्यासुद्धा स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यात अनुसूचित जमातीमध्ये पूर्वी प्रमुखजमाती 47 होत्या. त्यातील दोन जमाती वगळण्यात आल्या असून, आता 45 जमाती आहे. या 45 जमातीच्या उपजातींसह एकूण जमातींची संख्या 181 आहेत. यातील काही जमातींमध्ये मोठ्या प्रमाणात मूळजमातींच्या नामसाधर्म्याचा गैरफायदा लाटण्यासाठी घुसखोरी झाल्याचे घेऊन आदिवासींच्या सवलती चित्र आहे.
बोगस जात प्रमाणपत्राला आळा बसावा म्हणून महाराष्ट्र शासनाने 'अधिनियम 2000' पारित केला आहे. परंतु, खोटे जात प्रमाणपत्र घेणारे व देणाऱ्यांवर शासन कारवाई करीत नाही. म्हणून अनुसूचित जमातींचे 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध प्रकरणी कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्य भर आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
June, 11 2026
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
June, 11 2026
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
June, 11 2026
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
June, 11 2026
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
June, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज