*काजिर्डा जामदा प्रकल्प संबधीत ग्रामपंचायत मध्ये अधिकारी वर्गा सोबत मिटींग संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*काजिर्डा जामदा प्रकल्प संबधीत ग्रामपंचायत मध्ये अधिकारी वर्गा सोबत मिटींग संपन्न*
*काजिर्डा जामदा प्रकल्प संबधीत ग्रामपंचायत मध्ये अधिकारी वर्गा सोबत मिटींग संपन्न*
पाचल(प्रतिनिधी):-शुक्रवार दि.24 रोजी ग्रामपंचायत काजिर्डा येथे लघू पाटबंधारे आणि कृषी खात्याच्या अधिकारी वर्ग यांच्या सोबत झालेल्या मिटींगमध्ये
बाधित असलेला काजिर्डा जामदा प्रकल्प आज कुठेतरी होण्याच्या मार्गावर दिसत असताना आज सुद्धा अधिकारी वर्ग काही लोकांना हाताशी धरून गावकऱ्यांना संभ्रमात ठेवून कामे करत असल्याचे दिसून आले. गावकऱ्यांना पोस्टाने पाठवलेल्या पत्रावर पोस्टाचे शिक्केच नाहीत. रत्नागिरी वरून शेतकऱ्यांना पाठवलेली जवळ जवळ 500 पत्रांवर राजापूर, पाचल, काजिर्डा, ह्या कोणत्याही पोस्टाचा शिक्का नाही असे दिसून आले आणि शेतकऱ्यांची नावे चुकीची दिसून येताच माजी सरपंच आणि आता प्रशासकिय कारभार पाहणारे सरपंच चंद्रकांत शिंदे यांना दिसून आले. त्यांनी ही पत्र बोगस आहेत हे गावकऱ्यांना दाखवून देताच अधिकाऱ्यांची बोबडी वळली.
सदर त्या आधी शिंदे यांनी कायदेशीर मोजनी न व्हावी यासाठी 100 शेतकऱ्यांच्या हरकती संबधीत खात्याला अगोदर 10 / 15 दिवस दिल्या होत्या.
प्रकल्पला विरोध नसताना असे गावातील अन्य पुढारी गाठून जर काम केलीत तर खपवून घेणार नाही. असे दाखवून दिले. प्रत्येक काम, पत्र, ग्रामपंचायत यांच्या मार्फतच झालं पाहीजे अन्यता गावकरी गप्प बसणार नाहीत असे सांगण्यात आले. संबधीत अधिकारी व गावकरी यांच्या मताने अनेक विषयावर चर्चा होवून पुढील सर्वे कधी करावा हा ठरवण्यात आला. त्या प्रसंगी मुंबईकर व गावकरी येत्या 9 तारखेला गावामध्ये मिटींग लावून सर्व विषयावर चर्चा करून तुम्हाला पुढील तारीख कळवण्यात येईल असे ठरवण्यात आले आहे. मिटींगची तारीख पुढे सर्वांच्या मताने ठरवण्यात आली.
यावेळी पाटबंधारे, कृषी खात्याचे व सर्वेअर, हजर असलेले अधिकारी वर्ग व गावकरी वर्ग मोहीते, श्रीमान खराडे, रुपेश नागवेकर, वैभव पाटील, सर्वेअर पांडूरंग कदम, सागर मगदूम आणि गिरीश अन्य अधिकारी, चंद्रकांत शिंदे, राजाराम तोडकरी, संभाजी गुरव, प्रदिप चंदूरकर, शरद कांबळे केशव कांबळे, शिवाजी आर्डे, नितेश आर्डे, पो. पा. रामचंद्र आर्डे, शशीकांत आर्डे, मनोहर राणे, आनंदा आर्डे, असे अनेक गावकरी उपस्थित होते.



