*उन्हाळे येथील श्रीहा मतिमंद निवासी शाळेला वाॅटर प्युरिफायर प्रदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उन्हाळे येथील श्रीहा मतिमंद निवासी शाळेला वाॅटर प्युरिफायर प्रदान*
*उन्हाळे येथील श्रीहा मतिमंद निवासी शाळेला वाॅटर प्युरिफायर प्रदान*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील उन्हाळे येथील स्व. पार्वती गुणाजी कांबळी फाउंडेशन संचलित श्रीहा कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र या मतिमंद प्रवर्गातील मुलांच्या निवासी शाळेला युवक मंडळ शिरवलीचे अध्यक्ष विजय कुळये यांच्या प्रयत्नातून प्रशांत शिखरे आणि हेमंत कानगुटकर यांच्याकडून नुकताच वाॅटर प्युरिफायर भेट देण्यात आला
समाजातील मतिमंद मुले स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि आर्थिक दृष्ट्या सबल व्हावीत या हेतूने अशोक गुणाजी कांबळी यांनी अशा मुलांसाठी गेल्या वर्षाभरापूर्वी निवासी शाळा सुरू केली आपण काहीतरी वेगळे करावे या हेतूने प्रेरित झालेल्या कांबळी यांनी मतिमंद प्रवर्गातील मुलांसाठी काम करण्याचे धाडसी पाऊल उचलले सध्या त्यांच्या या कार्यशाळेत 18 ते 40 वयोगटातील 23 मुले आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम या निवासी कार्यशाळेत केले जाते शाळेला अद्याप कोणतेही शासकीय अनुदान नाही तरीही भविष्यात या प्रवर्गातील मुलांना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी कांबळी हे तनमनधन अर्पून कार्य करत आहेत आपले जर राजापूर येथे जाणे झाले तर नक्कीच या मतिमंद प्रवर्गातील निवासी शाळेला भेट द्यावी व शक्य असेल तर मदत करावी जेणेकरून या शाळेतील मुलांना निश्चितच मदत होईल आत्मसन्मानाने जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.



