*सत्यवान रेडकर यांचे 2 व 3 मे रोजी खेड व चिपळूणमध्ये निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सत्यवान रेडकर यांचे 2 व 3 मे रोजी खेड व चिपळूणमध्ये निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने*
*सत्यवान रेडकर यांचे 2 व 3 मे रोजी खेड व चिपळूणमध्ये निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने*
चिपळूण(प्रतिनिधी):-कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थी शासनाच्या विभागात विविध पदांवर प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी कोकणचे सुपुत्र, सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर, मुंबई, भारत सरकार हे पुढील वेळापत्रकाप्रमाणे खेड व चिपळूण येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार, 2 मे 2026 सकाळी 11 वा., डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, एल.पी.स्कूलच्या बाजूला, खेड एसटी स्टँड जवळ, ता. खेड, सायंकाळी 4 वा., नाभिक समाज सभागृह, खेर्डी, माळीवाडी, ता. चिपळूण तसेच रविवार 3 मे 2026 रोजी सकाळी 8.30 वा., ग्रामसेवक भवन, कापसाळ, ता. चिपळूण व दुपारी 3.30 वा., श्री राधाकृष्ण मंदिर, खांदाट, गवळवाडी, ता. चिपळूण येथे मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या व्याख्यानांचा जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. व्याख्यानासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही, फक्त वही व पेन सोबत असू द्यावे. कोणत्याही वैयक्तिक सबबी न देता कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडवण्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांसहित उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी श्री. सत्यवान यशवंत रेडकर, मो. ९९६९६५७८२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



