*अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ‘डिजिटल पाऊल’; मोबाईल अॅपद्वारे मिळणार सर्व सेवा-दिपक बोरसे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ‘डिजिटल पाऊल’; मोबाईल अॅपद्वारे मिळणार सर्व सेवा-दिपक बोरसे*
*अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ‘डिजिटल पाऊल’; मोबाईल अॅपद्वारे मिळणार सर्व सेवा-दिपक बोरसे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांसाठी महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी ‘Annasaheb Patil Mahamandal App’ हे नवीन मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपमुळे आता लाभार्थ्यांना सायबर कॅफे किंवा एजंटवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही, अशी माहिती आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक बोरसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
यापूर्वी महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करताना लाभार्थ्यांना संगणकाचा किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. याचाच फायदा घेऊन काही ठिकाणी एजंटमार्फत लाभार्थ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले होते. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि लाभार्थ्यांचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी महामंडळाने हे स्वतःचे स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित केले आहे, थेट नोंदणी: नवीन वापरकर्ते आपला मोबाईल क्रमांक, नाव आणि ईमेल नोंदवून ओटीपी (OTP) द्वारे त्वरित नोंदणी करू शकतात. तिन्ही टप्प्यांची सुविधा: योजनेतील महत्त्वाचे तीन टप्पे- LOI (Letter of Intent), उद्देश पत्र, मंजुरी (Sanction) आणि हप्ता मागणी (Claim) या सर्वांची प्रक्रिया अॅपवरूनच पूर्ण करता येईल.
कागदपत्रे अपलोडिंग: आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे थेट मोबाईलवरून स्कॅन करून अपलोड करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. अर्जाची स्थिती (Status): लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, हे कोठेही न जाता मोबाईलवर एका क्लिकवर पाहता येईल. महामंडळाने आता क्लेम सादर करणाऱ्या आणि नवीन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे 'जिओ-टॅग' (Geo-Tag) केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य केले आहे. यामुळे संबंधित लाभार्थी प्रत्यक्ष व्यवसाय करत असल्याची खात्री जिल्हा समन्वयकांना करता येईल. भविष्यात हे अॅप महामंडळाच्या ईएचआरएमएस (EHRMS) प्रणालीशी जोडले जाणार असून, गुगल मॅपच्या सहाय्याने व्यवसायाची पाहणी अधिक अचूक केली जाईल. संगणक प्रणालीवर उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा आता मोबाईलवर आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण उद्योजकांनी आणि लाभार्थ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करावे आणि या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक बोरसे यांनी केले आहे.



