ताजा खबरे:
*'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर सतर्क,चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश*
*1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन-धनंजय गोगटे*
*जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ 04 मे रोजी, तक्रारींचे निवारण होणार-आशा संघवी*
*अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ‘डिजिटल पाऊल’; मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळणार सर्व सेवा-दिपक बोरसे*
*पनीरच्या नावाखाली ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई-सपना पाटील*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पनीरच्या नावाखाली ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई-सपना पाटील*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पनीरच्या नावाखाली ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई-सपना पाटील*

  • Share:

*पनीरच्या नावाखाली ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई-सपना पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स आणि फास्ट-फूड केंद्रांमध्ये पनीर किंवा चीजच्या ऐवजी 'चीज अ‍ॅनालॉग'चा (दुधाव्यतिरिक्त इतर घटक वापरून बनवलेला पदार्थ) वापर करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सपना पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. अन्न सुरक्षा मानके नियमन 2011 नुसार, ‘पनीर’ हा केवळ दुधापासून बनविलेला पदार्थ आहे, जो प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. याउलट ‘डेअरी अ‍ॅनालॉ’ हा दूध विरहित खाद्यतेल, स्टार्च आणि इमल्सिफायर वापरून बनवला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला तरी प्रत्यक्षात पनीर नसतो. अ‍ॅनालॉग आरोग्यास अपायकारक नसला तरी त्याची पोषणमूल्ये पनीरपेक्षा वेगळी असतात. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 च्या तरतुदींनुसार ग्राहकांना आपण काय खातोय हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आता:
हॉटेल व्यावसायिकांनी अ‍ॅनालॉगचा वापर केल्यास तसा स्पष्ट उल्लेख मेन्यूकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड आणि बिलांवर करणे बंधनकारक आहे. विक्रेत्यांनी अ‍ॅनालॉगची विक्री करताना बिलावर 'डेअरी अ‍ॅनालॉग' किंवा 'चीज अ‍ॅनालॉग' असा स्पष्ट उल्लेख करावा. उत्पादकांनी पॅकेजिंग आणि लेबलिंग करताना ग्राहकांची दिशाभूल होणार नाही याची दक्षता घ्यावी.
अनेक अन्न व्यावसायिकांनी परवाना घेताना स्वतःचा ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक न देता त्रयस्थ व्यक्तीचा क्रमांक दिला आहे. अशा व्यावसायिकांनी तात्काळ स्वतःची माहिती अपडेट करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे-पाटील यांनी दिला आहे. पॅकेटवरील लेबल तपासा आणि ‘अ‍ॅनालॉग’ असा उल्लेख आहे का ते पहा. सुटे पनीर घेताना ते शुद्ध दुधाचे असल्याची खात्री करा आणि संशय आल्यास बिल मागा. हॉटेलमध्ये ऑर्डर देताना पनीर आणि अ‍ॅनालॉग हे स्वतंत्र पदार्थ असल्याची खात्री करा.
तक्रारीसाठी संपर्क: जर कोणत्याही ग्राहकाची अशा प्रकारे दिशाभूल होत असेल, तर त्यांनी प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर सतर्क,चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश*
April, 28 2026
*1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन-धनंजय गोगटे*
April, 28 2026
*जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ 04 मे रोजी, तक्रारींचे निवारण होणार-आशा संघवी*
April, 28 2026
*अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ‘डिजिटल पाऊल’; मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळणार सर्व सेवा-दिपक बोरसे*
April, 28 2026
*पनीरच्या नावाखाली ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई-सपना पाटील*
April, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज