*आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबावा-रामकृष्ण बी.पाटील यांची आग्रही मागणी.*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबावा-रामकृष्ण बी.पाटील यांची आग्रही मागणी.*
*आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबावा-रामकृष्ण बी.पाटील यांची आग्रही मागणी.*
नंदूरबार(प्रतिनिधी):- जिल्ह्यासह राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या सुमारे 70 हजार आशा सेविकांचे ऑक्टोबर 2025 पासून कामावर आधारित मिळणारा केंद्र शासनाचा हिस्सा असलेला मोबदला थकीत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आशा सेविकांवर दिवसेंदिवस कामाचा बोझा वाढत असताना त्यांना सहा सहा महिने मोबदला मिळत नसल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. सद्या लग्न सुरु असल्याने तसेच महागाई प्रचंड वाढल्याने थकीत मोबदल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे.
आशा सेविका गाव पातळीवर आरोग्याचा कणा असून त्यांना आरोग्यविषयक अत्यंत महत्वाची कामे करतात तसेच त्यासंबंधित माहिती संकलित करून वेळोवेळी वरिष्ठ्यांना सादर करतात. असे असतांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात वाढ करणे दूरच परंतु दैनंदिन कामाचा मोबदला सुद्धा नियमित अदा केला जात नाहीये. याबाबत युनियनने सततपणे पाठवपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आशा सेविकांना ऑक्टोबर 2025 पासून थकीत मोबदला येत्या आठ दिवसात अदा न केल्यास जिल्ह्यातील आशा सेविका जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करतील अशा इशारा आशा युनियनचे रामकृष्ण बी. पाटील यांनी दिला आहे.



