*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा 30 एप्रिल रोजी नंदूरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा 30 एप्रिल रोजी नंदूरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा 30 एप्रिल रोजी नंदूरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दिनांक 30 एप्रिल रोजी नंदूरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नंदूरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा नंदुरबार शहरातील सेंट मदर टेरेसा स्कूलच्या प्रांगणात होणार असून या मेळाव्यास जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित दिलीप मोरे यांनी केले आहे. मेळाव्याच्या निमित्ताने पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सदर मेळाव्यास पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित दिलीप मोरे यांनी केले आहे.