*नाशिक विभागीय सचिव पदी दिनेश वाडेकर यांची नियुक्ती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नाशिक विभागीय सचिव पदी दिनेश वाडेकर यांची नियुक्ती*
*नाशिक विभागीय सचिव पदी दिनेश वाडेकर यांची नियुक्ती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्तशिक्षक संघटना यांची नुकतीच विभागीय मीटिंग 25 एप्रिल रोजी झाली. यात दिनेश वाडेकर यांची लोकशाही पद्धतीने नाशिक विभागीय सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या विभागात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या समावेश आहे. दिनेश वाडेकर यांनी अगोदर ही जिल्हा कार्यकारणीत काम केले आहे. तसेच ते लायन्स क्लबच्या सचिव पदी, नंदुरबार विज्ञान अध्यापक मंडळ जिल्हा अध्यक्ष, विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असून विविध संघटना आणि सामाजिक संस्था यात विविध पदावर कार्यरत आहेत. या निवडीने त्यांचे सर्व समाज माध्यमातून, मित्र परिवारातून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.



