*कोकण कट्टा आयोजित विद्यार्थी अक्षररत्न 2026 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण कट्टा आयोजित विद्यार्थी अक्षररत्न 2026 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न*
*कोकण कट्टा आयोजित विद्यार्थी अक्षररत्न 2026 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न*
गोरेगाव(प्रतिनिधी):-कोकण कट्टाच्या वतीने लांजा, गुहागर तालुक्यातील विविध शाळांमध्ये अक्षर रत्न स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे हे स्पर्धेचे 16 वे वर्ष होतें. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार नाना शंकर शेट यांच्या मुबंईतील विविध कार्याची माहिती असलेला लेख लिखाणा साठी दिला होता तसेच लिखाण करण्यासाठी कागद हि देण्यात आला होता अ गट इयत्ता 4ते 6 वी व ब गट 7 वि ते 9 वी असा होता मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शालेय विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता मुंबई तसेच गुहागर तालुका आणि लांजा तालुक्यातील शाळांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती मुंबईतील गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालय या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. 23 एप्रिल 2026 रोजी संपन्न झाला. संगणक जरी उपयुक्त असले तरी हस्ताक्षर देखील उत्तम असणे काळाची गरज आहे. सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागीना हि म्हणं पुर्वी प्रचलित होती., सुंदर हस्ताक्षर हे व्यक्तीचे आचरण दर्शविते असे अनेक मार्गदर्शन पण संदेश उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात दिले पार पडला या कार्यक्रमाला खालील मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतें. रजनीकांत साळवी महाराष्ट्र विद्यालयाचे विश्वस्त अनिल देसाई
सल्लागार मुरलीधर मोरे कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे ज्येष्ठ चित्रकार अनिल कुबल, कोकण कट्टा अध्यक्ष विवेक वैद्य सदस्य जयवंत जोशी माध्यमिक विभाग मुख्याध्यापक विष्णू मसुरकर, प्राथमिक मुख्याध्यापिका दिपाली राऊत इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका पूर्वा नाईक निवेदिका प्रणाली कोरगावकर व आभार प्रदर्शन जयश्री वाघमारे यांनी केले संगणक शिक्षिका श्रीमती अश्विनी आकलेकर आणि स्नेहल कदम यांचे सहकार्य लाभले.



