*वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण मुल्यांकनात 'अ' श्रेणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण मुल्यांकनात 'अ' श्रेणी*
*वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण मुल्यांकनात 'अ' श्रेणी*
शहादा(प्रतिनिधी):-वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण मुल्यांकनात 'अ' श्रेणी. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत असलेल्या महाविद्यालय व परिसंस्थाचे दर तीन वर्षांनी शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण अर्थात अकॅडेमिक ऑडीट केले जाते. या अकॅडेमिक ऑडीटमध्ये वसंतराव नाईक महाविद्यालयाला 'अ' श्रेणी प्राप्त झाली आहे.
विद्यापीठ कायदा 2016 नुसार प्रत्येक महाविद्यालयाचे विद्यापीठाने ठरवुन दिलेल्या शैक्षणिक व प्रशासकीय निकषाप्रमाणे महाविद्यालयाचे मुल्यांकन केले जाते. या मुल्यांकनात वसंतराव नाईक महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले पर्यन्त, NEP- 2020 नुसार अभ्यासक्रम अंमलबजावणी, संशोधन व प्रकाशन, विविध उपक्रमातून आलेले अनुदान, आर्थिक नियमितता, विद्यार्थी केंद्रीत उपक्रम, राष्ट्रीय सेवा योजना कार्य, प्लेसमेंट, ग्राम दत्तक योजना, पायाभूत सुविधा व ई-गव्हर्नन्स, विद्यार्थी सहाय्यसेवा, नियमित अध्यापन, पारदर्शक परीक्षा पद्धती, अद्ययावत ग्रंथालय, आवश्यक संसाधनांसह नव्याने उभारलेल्या प्रयोगशाळा व विद्यार्थी फीडबॅक यंत्रणा अश्या विविध शेत्रात उलेखनीय काम केले आहे. एकुणच महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षाच्या शैक्षणिक अहवालात 'अ' श्रेणी जाहीर केली आहे.
महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाची ही बाब लक्षात घेऊन सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव यांनी सर्वांचे अभिनंदन करून सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या आमच्या ध्येयाला या 'अ' श्रेणीमुळे बळ मिळाले आहे. यापुढे हे कार्य अधिक जोमाने व अधिक चांगल्या पद्धतीने आकाराला येईल. सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव व जिल्हा मुख्यालय स्काऊट गाईड आयुक्त मा. सौ. वर्षा जाधव, प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशु जाधव, संस्थेचे समन्वयक संजय राजपूत यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. बी. वाय. बागुल यांचेसह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग व पालक यांचे अभिनंदन केले आहे.



