*शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.*
*शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची 135 वी जयंती अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज. ग. नटावदकर कनिष्ठ विद्यालयाच्या प्रा. वर्षा घासकडबी, प्रमुख वक्ते हेमकांत धनगर, ज्येष्ठ शिक्षिका प्रणाली बोरकर इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमात इ.चौथी चा विद्यार्थी यश मच्छिंद्र माळी या विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारली. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे बालपण,त्यांचे शिक्षण आणि संविधानातील योगदान या विषयांवर प्रेरणादायी भाषणे सादर केली. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते हेमकांत धनगर यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या शिक्षणाप्रती असलेल्या निष्ठेचा उल्लेख केला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रगती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजीता वळवी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मोनिका नेरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



