*प्रकाशा कन्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रकाशा कन्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*
*प्रकाशा कन्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशा, मुले प्रकाशा व उर्दू प्रकाशा यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. नमन गोयल (मुख्य कार्यकारी अधिकारी) व प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या आदेशानुसार, तसेच शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या दिनांक 6 एप्रिल 2026 च्या पत्राच्या अनुषंगाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात केंद्रप्रमुख रामलाल पारधी यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
आयोजित स्पर्धा व उपक्रम घेण्यात आले. चित्रकला स्पर्धा
विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे सुंदर चित्रांद्वारे सादरीकरण केले. निबंध स्पर्धा
त्यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी निबंध लेखन करण्यात आले. वकृत्व स्पर्धा
विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारधारेवर प्रेरणादायी भाषणे सादर केली. अभ्यास अभियान
वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यास सत्र आयोजित करून शिक्षणात सशक्त करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी केंद्रप्रमुख रामलाल पारधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवर:
मुख्याध्यापक रविंद्र पाटील, जावेद अब्दुल रशीद मंसूरी (उर्दू शाळा), प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष गोपाल गावित, शिक्षिका नूतन पाटील, प्रियंका पाटील, संगीता राणे, शबीनाबानु जलालुद्दीन, जितेंद्र चौधरी, अंकुश गावित व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांनी प्रेरित होत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.



