*हॉटेल कामगाराचा खून करुन पसार झालेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील घटना, 4 आरोपी अटकेत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हॉटेल कामगाराचा खून करुन पसार झालेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील घटना, 4 आरोपी अटकेत*
*हॉटेल कामगाराचा खून करुन पसार झालेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील घटना, 4 आरोपी अटकेत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-11 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील तळोदा रोडवरील हॉटेल मंदाकिनी येथे काम करणारा इसम नामे सागर रमेश जाधव (कैकाडी), वय 25 वर्षे, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार हा रात्रीचे सुमारास हॉटेलमध्ये काम करीत असतांना इसम नामे उदयसिंग ऊर्फ विक्की राजुसिंग राजपुत, वय- 27 वर्षे, रा. साईबाबा मंदिराजवळ, परदेशीपुरा, नंदुरबार, कैलास रमेश पाडवी, वय 30 वर्षे, रा.वाघोदा, ता.जि. नंदुरबार निलेश ऊर्फ बंटी वसंत चौधरी, वय- 27 वर्षे, रा. कोहिनुर टाकी जवळ, नंदुरबार, दशरथ हिरालाल मुसळदे, वय- 29 वर्षे, रा. पातोंडा, ता.जि. नंदुरबार व एक फरार इसम अशांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन कामगार सागर जाधव यास वाईट वाईट शिवीगाळ करत 'आमचा मित्र जय वळवीच्या खुनाच्या गुन्हयामध्ये तुझे मालक जेलमध्ये असतांना तु हॉटेल चालू ठेवण्याची हिम्मत का केली, तुझा हॉटेल चालु ठेवण्याचा काय संबंध' असे बोलून कामगार सागर जाधव यास वरील नमुद आरोपीनी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने लाकडी दांडक्याने गंभीर दुखापत करीत त्याचे मृत्यूस कारणीभूत झाले म्हणुन त्यांचेवर उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 185/2026 भा. न्या. संहिता कलम 103(1), 189 (2) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तात्काळ आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना केल्या. त्याअन्वये स्थानिक गुन्हे शाखेकडून सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू असतांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, नमुद गुन्हयातील आरोपी हे पातोंडा ता. जि. नंदुरबार येथील एका शिवारातील जुन्या पडक्या बिल्डींगमध्ये लपून बसले आहेत, बावत खात्रीशीर माहितीच्या आधारे हेमंत पाटील यांनी लागलीच स्था.गु. शा. पथकास आरोपींचा शोध घेणेकामी रवाना केले. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने नमुद ठिकाणी आरोपींना सापळा रचुन पकडले व त्यांना गुन्हयाबाबत
विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबूली दिली. त्याअन्वये सदर आरोपींना 24 तासांचे आत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याचे स्वाधीन केले आहे. तसेच गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करुन पुढील कार्यवाही सुरू आहे. सदरची कारवाई नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि विकास गुंजाळ, असई/राकेश वसावे, पोहेकों/दिनेश चित्ते, मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, मनोज नाईक, अजित गावीत, मोहन ढमढेरे, पोना/चेतन साळवे, पोकों/अभय राजपुत, आनंदा मराठे यांनी केली आहे. "जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कुठल्याही घटनेबाबतची योग्य माहिती घेऊन सोशल मिडीयावर जबाबदारीने व्यक्त व्हावे, तसेच आपल्या कृती/पोस्टमुळे दोन समाजात किंवा जाती जातीत तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल अशी कोणतीही अनूचित कृती/पोस्ट/व्हिडिओ वायरल करु नये."



