*भाजपा जिल्हा प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद, कार्य दिशा देण्यासाठी लवकरच नंदुरबार जिल्हा दौरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भाजपा जिल्हा प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद, कार्य दिशा देण्यासाठी लवकरच नंदुरबार जिल्हा दौरा*
*भाजपा जिल्हा प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद, कार्य दिशा देण्यासाठी लवकरच नंदुरबार जिल्हा दौरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव येथील त्यांच्या निवासस्थानी नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण व धोरणात्मक बैठक घेतली. या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील पक्ष संघटनेची सखोल माहिती जाणून घेत संघटना अधिक बळकट, सक्रिय व परिणामकारक करण्यावर विशेष भर देण्यात आला.
यानंतर आमदार मंगेश चव्हाण लवकरच नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार असून अक्कलकुवा येथील किरसिंग वसावे यांच्या कार्यालयात तालुक्यातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात प्रत्येक तालुक्याचा सविस्तर आढावा घेत स्थानिक अडचणी, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा व संघटनात्मक स्थिती यांची प्रत्यक्ष माहिती घेण्यात येणार आहे. पक्ष संघटना अधिक सक्षम, मजबूत व प्रभावी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जिल्ह्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेत पुढील नियोजनावर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने किरसिंग वसावे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करून सकारात्मक व परिणामकारक संघटनात्मक कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप दादा वळवी, महेश तवर, उमेश पाडवी, अमृत चौधरी, जगदीश वसावे, सुधीर पाडवी आणि अन्य या प्रसंगी उपस्थित होते. तसेच, येत्या आठवड्यात अक्कलकुवा व नंदुरबार येथे पक्षाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन व मुक्कामाबाबत लवकरच अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
एकूणच, आमदार मंगेश चव्हाण यांच्या आगामी नंदुरबार जिल्हा दौऱ्यामुळे तालुकानिहाय सखोल आढावा घेतला जाणार असून जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला नवसंजीवनी मिळणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, उत्साह व संघटन बळकटीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रभारी संपर्क प्रमुखांनी सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. विशेषतः दुर्गम भागातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन व आवश्यक सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



