*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ योगेश पाटील यांची नियुक्ती* नंदुरबार(प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ योगेश पाटील यांची नियुक्ती* नंदुरबार(प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ योगेश पाटील यांची नियुक्ती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत नंदुरबार तालुकाध्यक्षपदी शिंदगव्हान गावाचे सुपुत्र डॉ. योगेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आदेशाने तसेच प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हाध्यक्ष. डॉ. अभिजीत मोरे यांच्या शिफारशीवरून करण्यात आली. या नियुक्तीमुळे नंदुरबार तालुक्यात पक्ष संघटन अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉ. योगेश पाटील हे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होऊन तळागाळातील कार्यकर्त्यांना नवे बळ मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील तसेच बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. योगेश पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. योगेश पाटील यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नंदुरबार तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया दिली.



