*युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत मॉक टेस्टचे आयोजन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत मॉक टेस्टचे आयोजन
*युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत मॉक टेस्टचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त युवा सेनेच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनासह JEE व NEET या स्पर्धा परीक्षांची मॉक टेस्ट विनामूल्य एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात घेण्यात आली.11 वी,12 वी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी युवा शिवसेना, नंदुरबार च्या वतीने दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी विनामुल्य मोकटेस्ट शहरातील अनुसूया अकॅडमी येथे घेण्यात आली. सदर परीक्षा दुपारी 1 ते 5 यावेळेस पार पडली. या परीक्षेस विद्यार्थ्यानी उत्तम प्रतिसाद दिला ही परीक्षा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने घेण्यात आली तसेच विभागीय सचिव विराज कवाडिया, विस्तारक कुणाल कानकाटे आणि नंदुरबार जिल्हा प्रमुख पंडित माळी तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख सागर पाटील याचा मार्गदर्शनात आणि समन्वयक अक्षय श्रीखंडे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज कुरेशी, युवासेना शहर प्रमुख शेखर जाधव, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, उपशहर प्रमुख आनंदा पाटील, उपशहर प्रमुख रोहित मराठे, जनक त्रिवेदी, अनुसया अकॅडमीचे संचालक विनायक ढोले व शिवसैनिक उपस्थित होते. या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळाला, तसेच त्यांच्या तयारीचे मूल्यमापन करण्याची संधी मिळाली. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि परीक्षेतील यशस्वी रणनीती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. युवा सेनेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक दिशा मिळाली असून, त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत झाली आहे. भविष्यात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवण्यास हातभार लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरत असून, जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरत आहे.



