*कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सर्वांनी ज्ञानाने अद्ययावत असणे आवश्यक-प्राचार्य डॉ.पी.झेड.झांबरे
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सर्वांनी ज्ञानाने अद्ययावत असणे आवश्यक-प्राचार्य डॉ.पी.झेड.झांबरे
*कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सर्वांनी ज्ञानाने अद्ययावत असणे आवश्यक-प्राचार्य डॉ.पी.झेड.झांबरे*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-"संगणक साक्षरतेची पुढची पायरी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. संगणकाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेकडे जगातील सर्व समस्यांचे उत्तर जरी असले, तरी उत्तराची अंमलबजावणी मानवालाच करावयाची आहे. त्यासाठी तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम असणे आवश्यक आहे.भविष्यातील दैनंदिन जीवनातील आव्हाने फार मोठी आहेत. त्यामुळे शिक्षक म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सर्वांनी ज्ञान व कौशल्याने अद्ययावत असणे ही काळाची गरज आहे" असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ.पी.झेड.झांबरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. ते श्रीमंत राजे दौलतसिंह रावल बी.एड. कॉलेज दोंडाईचा येथे आयोजित द्वितीय वर्ष बी.एड. विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभा निमित्ताने आयोजित शुभेच्छा सोहळा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. सर्वप्रथम चेतना दातेराव यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन व अभिवादन करण्यात आले. प्राजक्ता गिरासे, राहुल कुंवर, चेतन जाधव या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षातील बी.एड. प्रशिक्षणामधील अनुभव कथन केले. तसेच प्रथम वर्षातील विद्यार्थिनी दीपमाला भामरे यांनीही मनोगत सादर केले. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा सत्कार केला. प्रा.डॉ.प्रवीण बोरसे, प्रा.आर.पी. पाटील, प्रा.आर. एस. वळवी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी वर्षभरात विविध स्पर्धा व परीक्षांमधील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ.पी. झेड. झांबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रमोद बोरसे यांनी जीवनात जे जे कार्य कराल ते ते प्रामाणिकपणे करण्याचे आव्हान अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना केले.
दीपमाला भामरे यांनी आभार अभिव्यक्ती तर चेतना दातेराव यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. निशा ठाकूर व प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी केले. प्रा. रवींद्र पाटील, प्रा.रवींद्र वळवी, प्रा.रेवती बागुल, प्रा.सुनीता वळवी यांनी सहकार्य केले. कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर गिरासे व वीरपाल गिरासे यांनी सहकार्य केले.



