*आदर्श फौंडेशनचा पुरस्कार प्रदान समारंभ आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदर्श फौंडेशनचा पुरस्कार प्रदान समारंभ आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न*
*आदर्श फौंडेशनचा पुरस्कार प्रदान समारंभ आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न*
कोल्हापूर(प्रतिनिधी):-येथील शाहू स्मारक आदर्श फौंडेशन पर्सनल ऑफ द इयर 2026 समाज गुणगौरव संमेलन तसेच पुरस्कार प्रदान समारंभाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले की, आदर्श फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील सामाजिक, कला, क्रीडा सांस्कृतिक, तसेच चळवळ अशा विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते ही बाब कौतुकास्पद आहे. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल असे पुरस्कार म्हणजे इस्लामपूरच्या शिक्षिका सौ मंदाकिनी झाडे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला तर कोल्हापूर महानगरपालिका भूमिअभिलेख विभागातील घुणकी गावच्या श्रीमती वनिता उदय चव्हाण यांना आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. मिणचेकर म्हणाले की, पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपली जबाबदारी वाढली आहे असे समजून आताच्या युगात युवावर्ग आज दिशाहीन झाला आहे, त्याला योग्य दिशा देऊन त्यांना प्रवाहाबरोबर आणण्यासाठी सर्वांनी कार्य करावे. तसेच या फौंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व सामाजिक जन जागृती असे अनेक समाजपयोगी आदर्शवत उपक्रम राबविण्यात येतात. समाजात प्रत्येक सण कसे साजरे करावेत व त्याचे महात्मे सांगण्याचे काम आदर्श फौंडेशनचे अध्यक्ष विजय लोहार व त्याचे सहकारी करत आहेत. यावेळी मिणचेकर यांनी आदर्श फौंडेशन व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.अरुण घोडके प्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते व विचारवंत, डॉ. अनिल दूधभाते प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पुणे, पोपट ताकवणे सामाजिक कार्यकर्ते, दयानंद लोहार प्रसिद्धी कृषी तज्ञ, अर्जुन जाधव तसेच सचिन कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.



