*नंदुरबार येथे भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त दिगंबर जैन समाजामार्फत विविध कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त दिगंबर जैन समाजामार्फत विविध कार्यक्रम संपन्न*
*नंदुरबार येथे भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त दिगंबर जैन समाजामार्फत विविध कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील माणिक चौक परिसरात असलेल्या दिगंबर जैन समाज मंदिरात आज भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त सकाळी जलाभिषेक करण्यात आला. यासह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून समाज बांधवांसह मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भगवान महावीर यांची मूर्ती रथावर ठेवून सजविण्यात आली होती. यावेळी भगवान महावीर यांच्या जयघोष करीत समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. येथील दिगंबर जैन मंदिरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी सुशीला लक्ष्मी बाबूलाल जैन यांच्यामार्फत थंडगार लस्सी चे मोफत वाटप सर्व समाज बांधवांसाठी करण्यात आले होते. यासोबत मंदिरात सायंकाळी जन्मोत्सवानिमित्त पाळणा कार्यक्रम घेण्यात आला त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला त्यात विजय अजमेरा व महिला मंडळाने सहभाग नोंदविला. या सर्व कार्यक्रमांना समाज बांधव तसेच मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदम पाटोदी, महेंद्र झांजरी, नेमीचंद पाटोदी, कचरूलाल पाटोदी, सुरेश जैन, सतीश अजमेरा, अजित अजमेरा, मुकेश झांजरी, प्रतीक अजमेरा, विकी पाटोदी, मयूर पाटोदी, सचिन पाटोदी, कल्पेश काला, कैलास काला अजित यांच्यासह समाज बांधव उपस्थित.
अजितनाथ जैन नवयुवक मित्र मंडळाने कार्यक्रमांचे संयोजन केले.



