*जी.टी. पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी. पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न*
*जी.टी. पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयीन जीवनातील अनुभव पुन्हा एकदा जगले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे “ब्रँड ॲम्बेसेडर” असून ते संस्थेचे प्रतिबिंब असल्याचे सांगितले. “आज आमचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत असून त्यांच्या कार्यामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत होत आहे,” असेही त्यांनी अभिमानाने नमूद केले. यावेळी संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी माजी विद्यार्थ्यांनी संस्थेशी सतत जोडलेले राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.
प्रा. एस. जे. साक्रीकर यांनी आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा खरा आरसा आहे. त्यांचे योगदान महाविद्यालयाला आणि विद्यार्थ्यांना लाभो ही सदिच्छा व्यक्त केली.
मेळाव्यात माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रा. राजेंद्र शिंदे, विद्यमान नगरसेविका सायली रघुवंशी, डॉ. खुशी वाघ, डॉ. अविनाश पाटील, प्रा. आर. एल. नोडे, अँड. एम. एस. शेख, डॉ. आर. आर. मोरे, डॉ. योगेश राजपूत, शिवम बोरसे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी महाविद्यालयाशी असलेले भावनिक नाते व्यक्त करत, “या संस्थेमुळेच आम्ही घडलो” अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली. तसेच महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाला भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. तसेच काही माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे, करिअर काउन्सेलिंग आणि विविध उपक्रम राबविण्याची तयारी दर्शविली.
या मेळाव्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सांस्कृतिक वातावरणही अनुभवायला मिळाले. जुन्या आठवणींना उजाळा देणारे क्षण, मित्रमंडळींशी झालेली भेट आणि शिक्षकांप्रती व्यक्त केलेले ऋण या सर्वामुळे कार्यक्रम भावनिक व संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एम. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मनोज शेवाळे यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन प्रा. अंकुश रघुवंशी यांनी मानले. डॉ. डी. डी. गावीत यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. मेळावा अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.



