*नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विकासासाठी सेस निधीतून नाविन्यपूर्ण योजना, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विकासासाठी सेस निधीतून नाविन्यपूर्ण योजना, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा*
*नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विकासासाठी सेस निधीतून नाविन्यपूर्ण योजना, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, नंदुरबार यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद नंदुरबार येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियोजनातून सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात शिक्षण सेस निधीतून विद्यार्थी गुणवत्ता विकास, शाळांच्या पायाभूत सुविधा वाढविणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिक्षण सेस निधीचा उपयोग शाळा इमारत बांधकाम, वर्गखोली दुरुस्ती, प्रयोगशाळा, शिष्यवृत्ती, विद्यार्थी प्रोत्साहन योजना, गुणवत्ता वाढ कार्यक्रम यासाठी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. प्रस्तावित योजना (2026-27) शैक्षणिक गुणवत्ता विकास निधी, शिक्षक पुरस्कार योजना, स्काऊट -गाईड / कब- बुलबुल पुरस्कार, शाळा इमारत व वर्गखोली बांधकाम,
शिष्यवृत्ती योजना इयत्ता 4 थी व 7 वी विज्ञान विकास उपक्रम, विज्ञान प्रेरणा विशेष निवड कार्यक्रम, विज्ञान प्रयोगशाळा योजना, विद्यार्थी गुणवत्ता सर्वेक्षण या योजनांद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शाळांची सुविधा मजबूत करणे, शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि विज्ञानाभिमुख शिक्षणाला चालना देणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीदरम्यान संघटनेने प्रशासनास विविध मागण्या सादर केल्या. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी इयत्ता पहिलीतील पात्र विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल व सुलेखन वही उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांनी बजेटमध्ये तरतूद केल्याची माहिती दिली.
शिक्षकांच्या वेतन व सेवा विषयक मागण्यांमध्ये S-14 वेतनश्रेणी तात्काळ लागू करणे, अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित आदेश देणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रक्रिया पूर्ण करणे तसेच सेवा -ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे या मागण्या करण्यात आल्या. नवीन आर्थिक वर्षात S -14 बाबतची कार्यवाही पूर्ण होईल तसेच प्रस्तावातील त्रुटी दूर करून प्रशिक्षित आदेश देण्यात येतील, असे प्रशासनाने आश्वासन दिले.
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी तालुका स्तरावरून माहिती मागविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच सर्व संघटनांच्या मागील बैठकीचे प्रोसिडिंग उपलब्ध करून देणे व सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करून प्रसिद्ध करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
या बैठकीस उपशिक्षणाधिकारी सौ. वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्यवर्ती संघटनेची स्वतंत्र बैठक आयोजित करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.
संघटनेच्या वतीने अध्यक्ष रमेश गावित, सरचिटणीस संजय वळवी, उपाध्यक्ष गोपाल गावित, संघटक सतिष पाटील, सल्लागार अशोक देसले, परमेश्वर मोरे, संजय खैरनार, अनिल बेडसे, उल्हास लांडगे, दिपक सोनवणे, संपर्कप्रमुख रविंद्र आडगाळे, सहचिटणीस सुनिल नहिरे, संजय बाविस्कर, प्रसिद्धीप्रमुख निदेश वळवी, राहुल पवार, तसेच संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



