*आदिवासी संस्कृतीच्या सुरांनी उजळली "रापापुर" ची शिक्षण परिषद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी संस्कृतीच्या सुरांनी उजळली "रापापुर" ची शिक्षण परिषद*
*आदिवासी संस्कृतीच्या सुरांनी उजळली "रापापुर" ची शिक्षण परिषद*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील चिनोदा केंद्राची शिक्षण परिषद रापापुर, वरपाडा, चौगाव, या शाळांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रापापूर येथे आयोजित करण्यात आली होती. शिक्षण परिषदेचे अध्यक्ष चिनोदा केंद्राचे केंद्रप्रमुख सुकलाल पावरा होते. प्रमुख पाहुणे माजी सभापती यशवंतदादा ठाकरे, शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानदेव केदार, रापापूरचे सरपंच विक्रम वळवी, सेवानिवृत्त शिक्षक जेमलाल वळवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाबसिंग वळवी (रापापूर) शंकर पाडवी (वरपाडा) महेंद्र कोठारी (चौगाव) चिनोदा केंद्रातील शिक्षकवृंद, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आदिवासींची कुलदैवत "याहा मोगी माता" भारतीय स्त्री शिक्षणाचे दैवत "सावित्रीबाई फुले" यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आदिवासी वेशभूषेतील याहामोगी मातेची आरती बोलीभाषेत सादर करुन उपस्थित शिक्षक व मान्यवरांचे मन जिंकले. स्वागत गीताने रंगत वाढवली. ईशस्तवन व स्वागत गीत सादरीकरण केलेल्या मुलींचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांनी कौतुक करून बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले . प्रमुख पाहुण्यांचे सत्कार व सन्मान करण्यात आला. अकोला येथे राज्यस्तरीय " सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्कार " मिळाल्याबद्दल जयवंती चौधरी, जिल्हयात उत्कृष्ट बी एल ओ म्हणून काम केल्या बद्दल प्रकाश ठाकरे, तळोदा तालुक्यातील भावी केंद्रप्रमुख म्हणून धीरज खैरनार, अनिल सोनवणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. माजी सभापती यशवंत दादांनी शिक्षकांनी सामाजिक जाणिव राखून शैक्षणिक कार्य करण्याविषयी मार्गदर्शन केले. केदार यांनी निपुण महाराष्ट्र, स्वच्छता , व्दितीय सत्र परिक्षा, पॅट चाचणी, निवडणूक कामे, येणारी जनगणना, आनंददायी अध्यापन,भौतिक सुविधा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विक्रम वळवी यांनी लोक प्रतिनिधींच्या संपर्कात राहून शाळेच्या अडचणी सोडवून घेण्याविषयी व शिक्षकाच्या सामाजिक वर्तनाविषयी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेतील केंद्राच्या "गुणवत्तेबाबत व विनोबा ॲप बद्दल" धीरज खैरनार यांनी माहिती दिली. निपुर महाराष्ट्र "अध्ययनस्तर विश्लेषण" ची माहिती जंगलसिंग पाडवी यांनी सांगितली. जयंत नारळीकर "गणित, विज्ञान अध्ययन समृद्धी" कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सक्रिय वापराबद्दल रविंद्र मुजगे यांनी माहितीचे सादरीकरण केले . "स्कॉफ मूल्यांकन" माहितीचे प्रदीप जामकर यांनी स्पष्टीकरण केले. निपुण महाराष्ट्र पूर्वतयारी "माझे वर्ग माझे नियोजन" च्या माहितीचे सायसिंग पाडवी यांनी सादरीकरण केले. प्रशासकीय विषय, मागील शैक्षणिक कामांचा आढावा, शाळा स्तरावर पालक सभांचे आयोजन, शंका व प्रश्न निरसन, बीएल ओचे कर्तव्य, लिंक बाबतची माहिती केंद्रप्रमुख सुकलाल पावरा यांनी दिली.
शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन दिपक वसावे यांनी केले तर आभार भरतसिंग वळवी यांनी मानले. कार्यक्रमासाठी भिमसिंग तडवी, अनिल वळवी, नानसिंग वळवी, लालसिंग तडवी,विश्वास देसाई, संदीप सोलंके, विद्यार्थी, ग्रामस्थांनी सहकार्य केले. अशा प्रकारे उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात शिक्षण परिषद पार पडली.



