*रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात, 71 रक्त़दात्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान,महिलांचाही सहभाग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात, 71 रक्त़दात्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान,महिलांचाही सहभाग*
*रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात, 71 रक्त़दात्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान,महिलांचाही सहभाग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील परदेशी पुऱ्यातील श्री राम मंदिरात मर्यादा पुरुषोत्त़म प्रभू श्री राम यांच्या जन्म़ोत्स़व निमित्त़ रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेषत: महिलांनी या रक्तदान शिबीरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आमदार चंद्रकांत रघूवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघूवंशी, उद्योजक मनोज रघूवंशी ,नगरसेवक अमित रघूवंशी , राजेश रघूवंशी, विलास रघूवंशी, आनंद रघूवंशी यांच्यासह परदेशी, रघूवंशी समाजाचे बंधू भगीनी उपस्थित होते. रघूवंशी समाजाच्या भजनी मंडळातील महिलांनी रक्तदान शिबीरात उत्स़फूर्त सहभाग नोंदवला.
नंदुरबार जिल्हयात अपघातात गंभीर जख्मी रुग्णांना रक्त लागते. थॅलेसिमिया रुग्णांना देखील रक्ताची मोठया प्रमाणावर गरज भासते. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, हा उदार हेतू ठेवून श्री रामनवमीचे औचित्य़ साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा रत्ना रघूवंशी यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधीलकी जोपासली. यावेळी प्रकल्प़ प्रमुख डॉ सुधीर देसाई व रक्तदान शिबीराचे आयोजक आनंद रघूवंशी यांनी रक्तदानाचे महत्व़ विशद करीत रक्तदान करणे किती गरजेचे आहे, याची माहिती दिली. जनकल्याण रक्त़ केंद्राचे प्रकल्प़ अधिकारी डॉ सुधीर देसाई,किशोर तांबोळी,शेखर पाटील, खलील काझी, आकाश जैन, जयश्री पाटील, पोर्णिमा पटले, संजय सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.



